Bus Bai Bus : 'बस बाई बस' (Bus Bai Bus) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या कार्यक्रमात सुबोध भावे (Subodh Bhave) सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) सहभागी होणार आहे.   


'बस बाई बस'च्या मागील भागात पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक खास सरप्राईज मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या येणाऱ्या भागात अभिनेत्री क्रांतीसह महाराष्ट्राचा लाडका भरत जाधव हजेरी लावणार आहे. आता क्रांती आणि भरत 'बस बाई बस'च्या मंचावर एकत्र येणार असल्याने प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे. 






भरत  जाधव आणि क्रांती रेडकरला 'जत्रा' या सिनेमाच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. या सिनेमातील  'कोंबडी पळाली' या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. आता 'बस बाई बस'च्या मंचावर क्रांती आणि भरत चांगलीच धमाल करताना दिसणार आहेत. 


'बस बाई बस' या कार्यक्रमासंदर्भात अभिनेता सुबोध भावे म्हणाला,"मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. पण, संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली, तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला". 


संबंधित बातम्या


Bus Bai Bus : सुप्रसिद्ध महिलांशी साधणार खास संवाद, ‘बस बाई बस’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत!


Kishori Pednekar On Amruta Fadnavis : 'अशी नशिबानं थट्टा मांडली...'; ठाकरेंना टोला लगावणाऱ्या अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं गाण्यातून प्रत्युत्तर