डॅनीचं खरं नाव मॅट ह्यूजेस असून तो जगभरातील सर्वात श्रीमंत पॉर्नस्टारपैकी एक मानला जातो. डॅनीचं माजी पॉर्नस्टार सोफी नाईटसोबत लग्न झालं आहे.
सप्टेंबर महिन्यात 'बिग बॉस हिंदी'चा बारावा सिझन सुरु होणार आहे. यामध्ये मिस नॉर्थ इस्ट इंडिया स्पर्धेची माजी स्पर्धक महिका शर्मा आणि डॅनी सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. महिका असेल तरच स्पर्धेत भाग घेण्याची अट डॅनीने घातली होती, असंही म्हटलं जातं.
डॅनी महिकासोबत 'मॉडर्न कल्चर' या चित्रपटात भूमिका करत आहे. महिका एका पॉर्नस्टारसोबत काम करणार असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांची काहीशी नाराजी आहे. मात्र ब्रिटीश तरुणाच्या प्रेमात पडणाऱ्या भारतीय मुलीची ही कथा असून हा कौटुंबिक चित्रपट असल्याचं ती सांगते.
मिलिंद सोमणला सपत्नीक 'बिग बॉस'ची ऑफर
बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचं असल्यास डॅनीला अॅडल्ट एंटरटेनमेंट (पॉर्न) इंडस्ट्रीला रामराम करावा लागू शकतो. 'कुठल्याही परिस्थितीत पॉर्न इंडस्ट्री सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महिका हे समजून घेईल, अशी आशा आहे. महिका आणि मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.' असं डॅनी म्हणतो.

'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वामध्ये सनी लिओन सहभागी झाली होती. विशेष म्हणजे सनीने भारतात आल्यानंतर पॉर्न इंडस्ट्रीला अलविदा केला.
डॅनी पहिल्यांदाच भारतात येत असून तो थेट गोव्यात महिकाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर बिग बॉसची प्रॉडक्शन टीम आणि चॅनलसोबत दोघांची चर्चा होईल.
बिग बॉसचा होस्ट सलमान खानची भेट घेण्यास डॅनी उत्सुक आहे. 'मी सलमानचे चित्रपट पाहिलेले नाहीत, मात्र त्याच्याविषयी खूप ऐकलं आहे. मी त्याचे फोटो पाहिले असून तो एकदम डॅशिंग दिसतो. मला त्याला भेटायचं आहे. या रिअॅलिटी शोचा भाग झालो नाही, तरी मला त्याला भेटायला आवडेल.' असं डॅनी सांगतो.
बिग बॉसच्या पुढच्या पर्वात जोड्या सहभागी होणार आहे. अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कोवर यांनाही विचारणा झाली आहे. दीपिका कक्कर-शोएब इब्राहिम, गुरमित चौधरी-देबिना बॅनर्जी, सृष्टी रोडे-मनिष नागदेव, ऋत्विक धनजानी-आशा नेगी या जोड्याही बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.