नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी एका लाईव्ह टीव्ही डिबेट शोमध्ये हणामारी करण्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एका महिलेच्या प्रश्नावर एका स्वामीने तिला कानशीलात लगावली होती. तसेच यानंतर तिला बेदम मारहाणही केल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळाले.


त्यावेळी या व्हिडिओतल्या त्या स्वामींची कोणालाही ओळख नव्हती. पण आता या स्वामींचा चेहरा अनेकांना परिचयाचा झाला आहे. कारण या व्हिडिओतले ते स्वामी दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर बिग बॉसच्या 10 व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले ओम स्वामीच आहेत. त्यावेळी राधे माँ संदर्भातील एका टीव्ही डिबेट शोमध्ये ओम स्वामी आणि एक धार्मिक विचारांची समर्थक दीपा शर्मा सहभागी झाले होते.

यावेळी या दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीत ओम स्वामींनी दीपा शर्मा यांच्यावर वैयक्तीक टीप्पणी केली. यामुळे संतप्त झालेल्या दीपाने ओम स्वामींवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. याचे प्रत्युत्तर म्हणून ओम स्वामींनी चक्क दीपा शर्माच्या कानशीलात लगावली.

बिग बॉसच्या घरात प्रवेशानंतर ओम स्वामी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला उपदेशाचे डोस पाजताना दिसले. दीपिकाने आपल्या आयुष्यातले अनेक किस्से सांगितले. यावर दिपिकाला ओम स्वामींनी उपदेशाचे डोस पाजताना, हॉलिवूड अभिनेत्री एलीझाबे टेलरच्या कपड्यांवरुन दीपिकाला उपदेश दिला.

व्हिडिओ पाहा