BB15 : काही दिवसांपूर्वीच बिग बॉस ओटीटीची घोषणा करण्यात आली आहे. बिग बॉसची घोषणा झाल्यापासूनच सोशल मीडियावर बिग बॉससंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. पण, यंदा बिग बॉस होस्ट करताना बॉलिवूडचा दबंग सलमान खान दिसणार नाही. तर, निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हा प्रसिद्ध शो होस्ट करणार आहे. करण जोहर सहा आठवडे सुरु राहणाऱ्या बिग बॉस ओटीटीचे अँकर असणार आहेत. बिग बॉस ओटीटीचं प्रिमियर 8 ऑगस्ट 2021 रोजी वूटवर होणार आहे. 


यंदातं बिग बॉस वेगळं असणार आहे. कारण यंदा पहिल्यांदाच चाहते बिग बॉसच्या घरातील ड्रामा 24 तास लाईव्ह पाहू शकणार आहेत. चाहते एक्स्ल्युझिव्ह कट्स, चोविस तासांच्या कंटेंट ड्राप्स आणि पूर्णपणे इंटरेक्टिव्ह सेशन पाहू शकणार आहेत. वूटवर डिजिटल प्रीमियर पूर्ण होण्यासोबतच बिग बॉस 15 लॉन्च होणार आहे. जे कलर्सवर ऑन एअर जाणार आहे. 



स्पर्धक आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा असणार करण जोहर 


करण जोहरचा हटके अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे. तसेच करण याच हटके अंदाजात बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. याबाबत बोलताना करण जोहर म्हणाला की, "मी आणि माझी आई बिग बॉसचे खूप मोठे फॅन आहोत. आम्ही बिग बॉस आतापर्यंत एका दिवसासाठीही मिस केलेलं नाही. एक प्रेक्षक म्हणून खूप मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे. प्रेक्षकांसोबत शो होस्ट करणं हे मी नेहमीच एन्जॉय केलं आहे. आता बिग बॉस ओटीटीसोबत... हे निश्चितपणे ओव्हर द टॉप असेल"


आईचं स्वप्न सत्यात उतरलं 


करण जोहरनं बोलताना सांगितलं की, "मी बिग बॉस होस्ट करणं म्हणजे, माझ्या आईचं स्वप्न सत्यात उतरणं आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये खूप जास्त ड्रामा असणार आहे. मला आशा आहे की, मी प्रेक्षक आणि मित्रांच्या अपेक्षांवर खरा उतरेल. 'विकेंड का वार' कंटेस्टंटसोबत आपल्या खास अंदाजात आणि आणखी मनोरंजनात्मक बनवू शकेल."


सलमान खान करणार बिग बॉस 15 होस्ट 


दरम्यान, करण जोहर फक्त बिग बॉस ओटीटी होस्ट करणार आहे. बिग बॉस ओटीटी केवळ सहा आठवडे सुरु राहणार आहे. त्यानंतर बिग बॉस 15 चं सीझन सुरु होणार आहे. जो स्वतः सलमान खान रिलीज करणार आहे. बिग बॉस 15 कलर्स आणि वूटवर ऑन एअर जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


तो मी नव्हेच! 'बातमीदारी करताना जबाबदारी बाळगा', अभिनेता उमेश कामतला मनस्ताप, काय आहे प्रकरण?