Bigg Boss Marathi New Season Day 32 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील समीकरण पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात काही सदस्यांमध्ये वाद होत आहेत. तर काही सदस्यांमध्ये मात्र चांगलीच मैत्री पाहायला मिळत आहे. सदस्य आता जोडीत अडकले गेले आहेत. जोड्यांच्या बेड्यांनी काहींच्या मैत्रीत मेळ जमवला आहे. या जोड्यांच्या बेडीत आज एक जोडी मात्र चांगलीच गाजणार आहे. तर दुसरीकडे ही बेडी कोणाचा गेम करणार याकडेही सर्वांचच लक्ष लागलं आहे. 


बिग बॉस मराठीच्या घरात फुल ऑन कल्ला


बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात किचनमधल्या कामावरून खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेची चांगलीच धमाल सुरू आहे. अंकिता आणि वर्षा ताईंचे 'तू तू मैं मैं' पाहणं प्रेक्षकांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे. आजच्या भागात वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर यांच्या बाचाबाची पाहायला मिळणार आहे. वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर यांच्या 'तू तू मैं मैं' मध्ये सूरज चव्हाण अडकल्याचं दिसणार आहे, तर पॅडी भाऊही यामध्ये उडी घेताना दिसत आहे. कलर्सने आजच्या भागाचा नवीन प्रोमो आऊट केला आहे.


बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो






अंकिता आणि वर्षाताईंमध्ये ‘तू तू मैं मैं’


'बिग बॉस मराठी'च्या घरात कालच्या भागात खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेचा धमाल किचन ड्रामा पाहायला मिळाला. तर गोलीगत सूरज भावजी मात्र दुरून मजा घेताना दिसून आले. आता बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, सूरज वर्षाताईंना म्हणतोय, "आई या वहिनींना सांग जरा". त्यावर अंकिता म्हणते, "भावजी लावलं की, नाही सासूबाईंना कामाला". त्यावर वर्षा ताई म्हणतात, "आता मी सूनबाईंना कामाला लावणार आहे". अंकिता म्हणते, "मी कामं करणारच नाही. माझी मर्जी". पॅडी म्हणतो, "भावजी भावजी मिठाचा खोका... भावजींच्या मिशीवर बसला बोका". 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss 18 : सलमान खानच्या शोमध्ये 'सरकटा'ची एन्ट्री, कोण आहे स्त्री 2 फेम सुनील कुमार?