Bigg Boss 18 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त पण कायम चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस. सलमान खानच्या बिग बॉस शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 3 अलिकडेच संपला असून आता बिग बॉसप्रेमी आगामी सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानच्या बिग बॉस 18 सीझनमध्ये कोणते स्पर्धक वर्णी लावणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यंदाच्या सीझनसाठी अनेक स्पर्धकांची नावे सध्या चर्चेत आहे. बिग बॉस 18 साठी अनेक सेलिब्रिटींना संपर्क साधण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement


'सरकटा'ची 'बिग बॉस 18' मध्ये एन्ट्री?


आता 'स्त्री 2' (Stree 2) चित्रपटामध्ये 'सरकटा'ची भूमिका साकारणारा अभिनेता सुनील कुमार (Sunil Kumar) 'बिग बॉस 18' मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता सुनील कुमार 'स्त्री 2' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. सुनील कुमारने पिंकविलाशी बोलताना सांगितलं की त्याला बिग बॉस कडून नुकताच कॉल आलाल होता. बिग बॉसचा नवीन सीझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे. सुनीलने सांगितलं की, तो  'बिग बॉस' शोमध्ये सहभागी होण्याच्या विचारात आहे पण तो पोलिसात नोकरी करत असल्याने त्याला सुट्टी मिळण्यात अडचण येणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे.


बिग बॉसच्या टीमकडून सुनील कुमारशी संपर्क


अभिनेता सुनील कुमारने सांगितलं की, पोलिस दलात कार्यरत असल्याने त्याला आधी रजेसंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल. तयांचे वरिष्ठ त्याला खूप पाठिंबा देतात, असंही त्याने यावेळी सांगितलं आहे. अधिकारी त्याला चित्रपट, जाहिराती किंवा कुस्तीच्या कार्यक्रमांसाठी वेळ देण्यास मदत करतात आणि ते कधीही रजा नाकारत नसल्याचं त्याने म्हटलंय. बिग बॉसचा भाग होण्याबाबत सध्या विचार करत असल्याचं सांगितलं आहे.




बिग बॉस 18 मधील स्पर्धकांची यादी


बिग बॉस सीझन 18 साठी अनेक सेलिब्रिटींशी संपर्क करण्यात आला आहे. यंदाच्या सीझनसाठी आतापर्यंत, सोमी अली, अंजली आनंद, अर्जुन बिजलानी, शोएब इब्राहिम, समीरा रेड्डी, दीपिका आर्य, मानसी श्रीवास्तव, अनिता हसनंदानी, सुरभी ज्योती, कनिका मान आणि इतर अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत, यासह अतर अनेक सेलिब्रिटींनी बिग बॉसच्या निर्मात्यांकडून संपर्क करण्यात आला आहे, जे या शोचा भाग असू शकतात. मात्र, सोमी, अर्जुन, शोएब यांनी या शोचा भाग होण्यास नकार दिला आहे.


कोण आहे 'स्त्री 2' फेम सुनील कुमार?


अभिनेता सुनील कुमार त्याच्या 7.7 फूट उंचीमुळे ओळखला जातो. सुनील कुमार हा जम्मूचा रहिवासी आहे. त्याला 'ग्रेट खली ऑफ जम्मू' नावानंही ओळखलं जातं. सुनील कुमार एक कुस्तीपटू आणि सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहे. सुनील कुमार जम्मू-काश्मीर पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत आहे. सुनील कुमार 'स्त्री 2' चित्रपटामध्ये सरकटा ही भूमिका साकारल्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.