मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) दमदार सीझनला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरातील पहिला आठवडा फारच रोमांचक ठरला. पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात भांडण आणि राडा पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात काही स्पर्धकांनी बिग बॉसतं घर डोक्यावर घेतलं होत, तर काही स्पर्धक इतरांच्या झगमगाटात गायब झाल्याचं पाहायला मिळालं. वीकेंडचा रितेश भाऊने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने एका मागोमाग एक स्पर्धकांच्या चुका दाखवत सगळ्यांचा माज उतरवला.


सूरज म्हणतोय निक्की आहे गुलीगत धोका


पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काही स्पर्धक वरचढ ठरले, तर काही स्पर्धकांना खेळ समजण्यातच वेळ गेला. निक्की, अरबाज यांनी फूल प्लॅनिंग करत पहिल्या आठवड्यात त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना सेफ करुन घेतलं. घरातील इतर सदस्यांना एकमेकांचा विश्वासच संपादन करता आला नाही. आता हळूहळू इतर स्पर्धकांना गेम कळू लागला आहे. बिग बॉसने सूरज चव्हाण याचा आत्मविश्वास वाढवला, त्यानंतर रितेश भाऊनंही त्याला न घाबरता खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आता सूरजचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


एका बुक्कीत काढणार टेंगुळ


आजही भाऊचा धक्का पाहायला मिळणार आहे. आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. नवीन प्रोमोमध्ये रितेश देशमुख म्हणतो, सूरज मला सांगा, इथे गुलागत धोका कोण आहे यावर उत्तर देत सूरज म्हणतो निक्की. असं का विचारल्यावर सूरज म्हणतो, "असंच वाटतंय". यानंतर रितेश भाऊ दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला बुक्कीत टेंगुळ कुणाला द्यायचंय, यावरही उत्तर देताना सूरज निक्कीचं नाव घेतो. सूरज म्हणतो, "एक दिवशी पोरगी काय देते गुलीगत धोका, मग काढायचं बुक्कीत टेंगुळ" 






नेटकरी म्हणाले, "क्या बात हैं"


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, सूरज नाही सगळ्या महाराष्ट्राला तिला बुक्की देऊ शी वाटतं असेल. दुसऱ्याने लिहिलंय, सूरजने बरोबर ओळखलं आहे निक्कीला, कडक बोलास भावा. तिसऱ्याने लिहिलंय, थोडे दिवस थांबा हा सीझन सुरज चव्हाणच गाजवणार. आणखी एकाने लिहिलंय, सूरज भाऊ... बुकीत डेंगूल... आता सुट्टी नॉट...". "सूरज बरोबर ओळखला आहे गेम, काहीही म्हणा पण कंटेट आहे भावाकडे... बुक्कीत टेंगुळ... क्या बात हैं", असंही एकानं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात फ्रेंडशिप डेचं खास सेलिब्रेशन, वर्षा ताईंची जान्हवीला भेट; मूर्ख मित्राचं लॉकेट देत म्हणाल्या, मैत्रिणीसाठी...