Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच प्रसिद्ध शो बिग बॉसच्या नव्या सीझनला लवकरच सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या चाहत्यांना नवीन सीझनची उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांच्या नावावरून पडद्या उघडण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 100 दिवस चालणाऱ्या या शोकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


बिग बॉस मराठीचा पहिला स्पर्धक ठरला? 


यंदा बिग बॉस मराठीचा सीझन काहीसा वेगळा असणार आहे. याचं कारण म्हणजे यंदा शोचा होस्ट बदलला आहे. यंदा बिग बॉस मराठी होस्ट करण्याची जबाबदारी महेश मांजरेकर यांच्या जागी महाराष्ट्राचा दादा अभिनेता रितेश देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मनोरंजन विश्व गाजवणारा रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांची कशाप्रकारे शाळा घेणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 


अभिनेत्याने सोशल मीडियावर दिली हिंट


यंदा बिग बॉस मराठीच्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, एका अभिनेत्यानं मात्र तो बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची हिंट दिली आहे. एका अभिनेत्याने त्याच्या बिग बॉस मराठीच्या घरातील एन्ट्रीवर शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात येत आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत बिग बॉस मराठीबाबत मोठी हिंट दिली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.


अभिनेत्याकडून सोशल मीडियावर शिक्कामोर्तब


अभिनेत्याच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे बिग बॉस मराठीचा पहिला स्पर्धक ठरल्याचं बोललं जात आहे. अभिनेता शुभंकर तावडे याने त्याच्या इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठी शोसंदर्भात स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर तो बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री घेणार असल्याचा संबंध चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. शुभंकर तावडे याचं नाव बिग बॉससाठी काही दिवसांपासून चर्चेत होतं. त्यानंतर त्याची इंस्टा स्टोरी पाहता, त्याने या चर्चांवर शिक्कामोर्तब केल्याचा दावा चाहत्यांकडून करण्यात येत आहे.


अभिनेता शुभंकर तावडे बिग बॉस मराठीच्या घरात?




दरम्यान, काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली. 'वेड लावणारं प्रेम तर याच्याकडून शिकावं, पण हा आहे तरी कोण?' असा प्रश्न विचारला होता. या पोस्टवर वेड लावलंय हे गाणंही लावण्यात आलं होतं. शुभंकर तावडे वेड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे शुभंकर तावडे आता बिग बॉसच्या घरात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार? Grey Divorce म्हणजे काय?