Bigg Boss Marathi Season 5 Day 52: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातील आठवा आठवडा आता सुरू झाला आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडला. त्यात पाच जण नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉसच्या घरात आठवड्यानुसार घरातील समीकरणेही बदलत आहेत. आता घरात आपण कोणत्या ग्रुपमधून खेळत आहोत, हे धनंजय पोवार (Dhananjay Powar) अर्थात डीपीदादाने स्पष्ट केले आहे.
घरातील सदस्य आपला खेळ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. खेळ दाखवताना कधी कोण कोणाचा गेम पलटवेल याचा अंदाज बांधता येत नाही. पहिल्या आठवड्यात दिसणाऱ्या एका टीममध्ये शेवटच्या आठवड्यातही तेच एकीचं चित्र पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांपासून आपल्या बी टीम पासून काहीसं वेगळं राहणारे डीपीदादा आता वेगळंच खेळणार आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये डीपीदादा आणि निक्की तांबोळीसोबत चर्चा करताना दिसत आहे. डीपी दादा म्हणतात की,"मी कोणत्याही टीमचा भाग नाही आहे. स्ट्रॅटजीच्याबाबत कोण बोलत होतं". त्यावर संग्राम डीपी दादांचं नाव घेतो. तर निक्की म्हणते,"पण दिसलं नाही ना". डीपीदादा खंत व्यक्त करताना म्हणतात की, "अभिजीत आणि अंकितामुळे मी सावली झालो".
डीपी दादा पुढे म्हणतात,"मला जर दिसायचंय तर मी तुमच्यात खेळू शकत नाही". नेहमी अंकिताच्या पाठीशी असणारे, तिला वेळोवेळी सल्ले देणारे डीपी दादा आता एकटं खेळताना दिसून येणार आहेत. डीपी दादा कसा खेळ खेळणार याकडे आता 'बिग बॉस प्रेमीं'च्या नजरा लागल्या आहेत.
अरबाजचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी दादा, अंकिता, अभिजीत आणि संग्राम अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. पॅडी दादा म्हणत आहेत,"अरबाजचा नेहमीच ओव्हर कॉन्फिडन्स नडतो". संग्राम म्हणतो,"जिंकण्याचं कधीच सेलिब्रेशन करायचं नसतं. निक्कीचं का ऐकतो तो?. त्याला मतं नाहीत". पॅडी दादा पुढे म्हणतो,"निक्की अरबाजला घेऊन बुडणार एवढं नक्की" असे म्हणतो.
घराबाहेर पडण्यासाठी हे सदस्य नॉमिनेट...
बंदूक उचलण्याच्या या टास्कमध्ये अपयशी झाल्याने 'ए टीम'मधील निक्की तांबोळी,सूरज चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावंकर या आता घराबाहेर पडण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले. त्यामुळे या पाच सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. टास्कमध्ये अपयशी झाल्याने नॉमिनेट झाल्यावर निक्कीचा चेहरा चांगलाच उतरला होता.