Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझनने (Bigg Boss Marathi Season 5) आता आठव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. वैभव चव्हाण घराबाहेर पडल्यानंतर सावध झालेल्या इतर सदस्यांनी आपल्या खेळावर भर देण्यास सुरुवात केली आहे.  या आठवड्यात घरात 'जंगल राज' आहे. काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सर्वच सदस्यांनी 100 टक्के दिले. त्यानंतर आता घरात इतर सदस्य एकमेकांविरोधात रणनीती आखताना दिसणार आहेत. आज घरात अभिजीत, पॅडी दादा आणि संग्राम अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.
 
घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी अरबाजही नॉमिनेट झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये, अभिजित संग्रामला म्हणतोय की, मला वाटतं यावेळी अरबाज जाईल. त्यावर संग्राम म्हणतोय, मग निक्कीचं काय होणार? दोघाचं गुलुगुलू तर सुरू असतं. अभिजीत पुढे म्हणतोय, ''अरबाज टास्कपुरता येतो आणि नंतर आपल्या गुहेत जातो.सिंह कसे असतात, शिकार मादी करत असते, त्यावर सिंह ताव मारतो आणि गुहेत जातो. तसं त्याचे झाले असल्याचे अभिजीत सांगतो.  






दरम्यान, बिग बॉसच्या घरातून  वैभव चव्हाणची एक्झिट झाल्याने अरबाजला मोठा धक्का बसला आहे. शो सुरू झाल्यानंतर सदस्यांचे ग्रुप झाले  होते. त्यातील ए ग्रुपमधील अरबाज आणि निक्की हे दोघेच उरले आहेत. तर, जान्हवीने फारकत घेतली आहे.  


घराबाहेर पडण्यासाठी हे सदस्य नॉमिनेट...


बंदूक उचलण्याच्या या टास्कमध्ये अपयशी झाल्याने 'ए टीम'मधील निक्की तांबोळी,सूरज चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावंकर या आता घराबाहेर पडण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले. त्यामुळे या पाच सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.  टास्कमध्ये अपयशी झाल्याने नॉमिनेट झाल्यावर निक्कीचा चेहरा चांगलाच उतरला होता. 


इतर संबंधित बातमी :