Savlyachi Janu Savli : झी मराठी वाहिनीवर (Zee Marathi) मागच्या काही काळामध्ये अनेक नव्या मालिकांची सुरुवात झाली. त्यामुळे काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता पुन्हा एकदा झी मराठी एक नवी मालिका सुरु होणार असून आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता आहे. झी मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका, एक नवीन गोष्ट घेऊन येत आहे. 'सावळ्याची जणू सावली' असं या मालिकेचं नाव आहे. दरम्यान या मालिकेतून अभिनेत्री मेघा धाडेही कमबॅक करतेय. 


सावली  नावाच्या मुलीची जी रंग रूपाने साधारण, पण स्वभावाने प्रेमळ, शब्दाची पक्की आणि अत्यंत सुरेल आवाजाची, तिची ही कथा आहे.  सावली बारावीपर्यंत शिकली आहे आणि तीच स्वप्न आहे संगीतात MA करायचं .  विठ्ठलावर अपार श्रद्धा असलेली, कितीही विपरीत स्थितीतून मार्ग निघू शकतो अशा आशावादी विचारांची कुटुंबावर अपाड प्रेम करणारी, अशी ही सावली आहे. सावलीच्या जन्मावेळी एक मोठी उलाढाल होते. कान्हुच्या पोटी जन्माला आलेली हि सावळ्या रंगाची मुलगी जन्मल्यावर श्वास घेत नसल्यामुळे, एकनाथला मेलेली मुलगी झाली अशा निष्कर्षापर्यंत गाव पोहोचत असताना  एकनाथ आपल्या मुलीला विठ्ठलाच्या चरणी ठेवतो आणि चमत्कार होतो. मुलीत प्राण फुकले जातात. म्हणून तिचे  नाव सावली ठेवले जाते.


मालिकेत झळकणार 'हे' कलाकार


या मालिकेत  सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, साईंकित कामत, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा  धाडे  एका मत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. जवळपास १३ वर्षांनी वर्षानंतर मेघा पुन्हा मराठी डेली सोप मध्ये दिसणार आहे.  


16 सप्टेंबरपासून सुरु होणार मालिका


काय होईल जेव्हा समोरा समोर येतील सावली आणि सारंग? काय होईल जेंव्हा तिलोत्तमाच्या सौंदर्याचं अमाप वेड असलेल्या जगात घडून येईल उलथापालथ? जगाला कधी कळू शकेल कि भैरवी वझे च्या मुलीचा म्हणजे ताराचा खरा आवाज सावली आहे? विठ्ठलाची भक्त असलेली सावली कशी शोधेल तिच्या जीवनाची वाट? हे सगळं येत्या 16 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Prasad Oak : 'लहान मुलासारखा आनंद...', प्रसाद ओकच्या लेकाचं बाबाला स्पेशल गिफ्ट, मंजिरी ओकची भावुक पोस्ट