Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात मंगळवारी निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार वादावादी झाली. निक्कीवर चिडलेल्या अरबाजचे अभिजीतसोबतही खटके उडाले. वादावादी-संतापाच्या भरात अरबाजने घरातील वस्तूंची आदळाआपट केली. या सगळ्या घडामोडींमुळे बिग बॉसच्या घरात काही वेळेसाठी तणावाचे वातवरण तयार झाले होते. आता मात्र घरातील सदस्य निक्की-अरबाजची फिरकी घेताना दिसणार आहेत.


'बिग बॉस'च्या घरात नात्यांची समीकरण कधी बदलतील हे सांगू शकत नाही. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच नात्यांची नवी समीकरण तयार होतात. आता निक्की, अरबाज, अभिजीत यांच्याबाबतही नात्यांची नवी समीकरण तयार झालेली पाहायला मिळत आहेत. 


'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये सूरज आणि आर्या निक्की, अरबाज, अभिजीत यांच्यातील नात्यांवर एक खास गाणं म्हणताना दिसून येत आहेत. त्यावर घरातील इतर सदस्यही मजा घेताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात  मंगळवारच्या वादानंतर आजच्या भागात बिग बॉसच्या घरात चांगलेच वातावरण दिसून येणार आहे. त्यामुळे वादावादी पाहणाऱ्या प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी मिळणा आहे. 






निक्कीने टीम A ला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजीतचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आता किती दिवस निक्की आणि अभिजीतची जोडी एकत्र दिसेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. पण त्यांची मैत्री मात्र लक्ष वेधून घेत आहे.


निक्की, अभिजीत, वर्षा आणि अंकिता; या आठवड्यात कुणाचा खेळ संपणार? 


पाचव्या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर निक्की, अभिजीत, वर्षा आणि अरबाज हे सदस्य नॉमिनेट झालेत. नॉमिनेशनसाठी 'मानकाप्या' हे कार्य पार पडलं. घरातील सदस्य हे सध्या जोड्यांमध्ये बांधले गेले आहेत. त्यामुळे नॉमिनेशनही जोड्याचं झालं. यामध्ये वर्षा अंकिता ही जोडी आणि निक्की अभिजीत ही जोडी नॉमिनेट झाली.