Bigg Boss Marathi Season 5 : सोशल मिडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Prabhu Walavalkar) हिनेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. पण मानकापाच्या टास्कमध्ये अंकिताला नॉमिनेट करण्यात आलं आणि ती घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाली. असं असलं घरातील कोणताच सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाणार नसल्याची खात्री प्रेक्षकांना झाली होती. कारण या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद होत्या. पण तरीही बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात 'कोकण हार्टेड गर्ल' सध्या 'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आहे. पण अंकिता प्रभू-वालावलकरचा 'बिग बॉस मराठी'मधला प्रवास आता संपला असल्याचं प्रोमोमुळे पाहायला मिळतंय. बिग बॉस मराठीच्या घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळालं. पण अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचं चित्र सध्या आहे.
बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे,"या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता". त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडली आहे. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
वर्षाताईंचा कल्ला, धनश्या:मला कोसळलं रडू
प्रोमोमध्ये पुढे दिसत आहे की, वर्षाताईंनी निक्कीचं नाव लिहिलेलं असतं तर अंकिताने डीपी दादाचं नाव लिहिलेलं असतं. उत्तर चुकल्यामुळे वर्षा ताई अंकिताला म्हणतात, "सगळी जनता निक्कीबद्दल बोलते एवढी तरी सामान्य ज्ञान तुला असायला हवं". उत्तर चुकल्याने वर्षा ताई चांगलाच कल्ला करतात. त्यांचा कल्ला घरातील सर्व सदस्यांचं लक्ष वेधून घेतो. तसेच शॉकदरम्यान घन:श्यामची उडालेली तारांबळ पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे.