Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अभिनेता रितेश देशमुखच्या होस्टिंगने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. पण, आता बिग बॉस मराठी शो, निर्माते आणि होस्ट रितेश देशमुख यांच्यावर टीकांचा भडीमार होताना पाहायला मिळत आहे. आर्याला वेगळा न्याय आणि निक्कीला वेगळा, असं म्हणत नेटकरी टीका करत आहेत. सोशल मीडियावर बिग बॉस प्रेमी बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख यांच्या निषेधार्थ कमेंट करत आहेत.

Continues below advertisement

"बिग बॉस आणि रितेश निक्कीचे पाठीराखे"

आर्या जाधवने निक्की तांबोळीवर हात उचलल्यामुळे तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं. दरम्यान, आर्याला घराबाहेर काढण्याच्या निर्णयाचा सोशल मीडियावर विरोध करण्यात येत आहे. आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य आहे. निक्की आणि अरबाज टास्कमध्ये धक्का-बुक्की करतात ती हिंसा दिसत नाही, पण आर्याने केलेली हिंसा दिसते, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

महेश मांजरेकरांना परत आणा, बिग बॉस प्रेमींची मागणी

 

एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय, "रितेश देशमुख आज तुम्ही हरलात. मराठी म्हणून लाज वाटली पाहिजे. लहान मुलांना मारामारी नाही दाखवणार, मग त्या निक्की आणि अरबाजची लव्ह स्टोरी दाखवून इथं मोठ उपकार केलात". दुसऱ्याने लिहिलंय, "रितेश भाऊ तुम्ही डोअरमॅट आहात निक्कीचा". आणखी एकाने लिहिलंय, "बिग बॉस❌❌ निक्कीचा दास✅✅" तिसऱ्याने लिहिलंय, "रितेश देशमुख ❌ रितेश तांबोळी ✅" आणखील एकाने सवाल उपस्थित करत म्हटलंय, "आर्यासाठी एक न्याय आणि निक्कीसाठी वेगळा का? वाह रे वा... बिग बॉस मराठी स्क्रिप्टेट शो."

रितेश देशमुखवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रेक्षकाने कमेंटमध्ये लिहिलंय, "काय हे रितेश विलासराव देशमुख सर? शोभल का हे मराठी असून असं मराठी लोकांसाठी असं वागणं, त्या निक्कीने संग्रामला काय काय नाही बोललं, जान्हवी आर्याला नखे मारली, धक्का-बुक्की करताना आर्याला दरवाजा मारला तो चुकून? आर्याने मारलं तर जाणून-बुजून? निक्की म्हणाली की, मी ह्या असल्या लोकांचं ऐकणार नाही, बिग बॉसने शिक्षा दिली, ती करेल पण काम करणार नाही, हे चाललं तुम्हाला? ती आणि तिची TRP इतकी आवडती तुम्हाला की तुम्ही माणुसकी विसरून गेलात? लोकांना काय भाषण देता माणुसकीचे जेव्हा तुम्हीच ती दाखवत नाही, फेअर खेळता येत नाही तर तोंडावर बोलायची हिंमत ठेवा की, आम्ही निकीचे डोअरमॅट आहोत, जाहीर निषेध आहे तुमचा रितेश देशमुख."

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : आर्याला बाहेर काढलं ना, आता बिग बॉसवर बहिष्कार; अनफॉलो करा, बघूच नका; सोशल मीडियावर नाराजीचा सूर