Bigg Boss Marathi Wild Card Entry : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चांगलाचा चर्चेत आहे. बिग बॉस मराठीचा यंदाच्या सीझनने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कलाकारा मंडळींसह सोशल मीडिया एन्फ्लुएंसर्संनाही एन्ट्री देण्यात आली असून प्रत्येक सदस्याची जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये निक्की आणि तिच्या टीमची खूपच चर्चा आहे. निक्की, जान्हवी, अरबाज आणि वैभवनं बिग बॉसचं घर जणू डोक्यावरच घेतलं आहे. यामुळे प्रेक्षकांकडून काही वाईल्ड कार्ड एन्ट्रीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.


बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले एन्ट्री?


बिग बॉस मराठीच्या घरात आता अभिजीत बिचुकले येणार असल्याची चर्चा रंगली आहे. कवी मनाचे नेते अशी ओळख असलेल्या अभिजीत बिचुकलेची आता बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. कवी मनाचे नेते अशी ओळख असलेल्या अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात दिसले होते. त्यानंतर त्याला हिंदी बिग बॉस 15 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अभिजीत बिचुकले झळकणार असल्याचा दावा केला जात आहे. 


अभिजीत बिचुकलेचं नाव चर्चेत


'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्ये अभिजीत बिचुकले हे एकमेव राजकीय नेते होते. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होता. बिग बॉस मराठीमुळे अभिजीत बिचुकलेची महाराष्ट्राचा चांगलीच ओळख झाली होती. त्यानंतर हिंदी बिग बॉसमुळे बिचुकलेला देशात ओळख मिळाली. आता त्याची बिग बॉस मराठीत पुन्हा एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


बिग बॉसम मराठी पॅरोडी अकाऊंटची पोस्ट चर्चेत






 


योगिता चव्हाणचा नवऱ्याची बिग बॉस मराठीत एन्ट्री?


'जीव माझा गुंतला' या मालिका फेम योगिता चव्हाण हिचा नव्या सीझनमध्ये चांगलाच बोलबाला दिसत आहे. पहिल्या आठवड्यात योगिता नॉमिनेशनमध्ये होती, त्याशिवाय घरातील इतर सदस्यांमधील राडा आणि भांडणाचाही तिला खूप त्रास झाल्याचं पाहायला मिळालं. पण, त्यानंतर योगित खंबीरपणे बिग बॉसच्या घरातील परिस्थितीला तोंड देत आहे. अशा परिस्थिती आता तिच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार अशी चर्चा आहे. योगिता चव्हाणचा पती सौरभ चौघुले याची बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.


बिग बॉस मराठीत राखी सावंतला वाईल्ड कार्डचं तिकीट?


'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्याच दिवसापासून आरडाओरड आणि आक्रमक भूमिकेने निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) सगळ्यांचेच लक्ष वेधलं आहे. निक्की तांबोळीने पहिल्या दिवसापासून वर्षा उसगावंकर (Varsha Usgaonkar) यांच्यासोबत वाद घातला. त्यासोबत ती घरातील इतर सदस्यांसोबतही भांडताना दिसत आहे. 'भाऊचा धक्का'मध्येही रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) निक्कीला यावरून वारंवार झापलं आहे. निक्कीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे निक्कीला अद्दल घडवण्यासाठी नेटकऱ्यांनी थेट राखी सावंतला (Rakhi Sawant) वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्याची मागणी केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात गुलिगत सूरज चव्हाणच्या बहिणीची एन्ट्री, बांधणार राखी; आजचा भाग ठरणार खास