Bigg Boss Marathi Day 45 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन 44 दिवस पूर्ण झाले असून आज 45 वा दिवस सुरू आहे. आजचा 45 दिवस खूपच कमाल असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. संग्राम चौगुलेच्या येण्याने बिग बॉस मराठीतील समीकरण बदलताना दिसणार आहेत. संग्रामच्या येण्यानं इतर सदस्यांच्या मनात धडकी भरली असली तर निक्की आणि अरबाजवर काही परिणाम झाल्याचं दिसलं नाही. आज बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


जान्हवी आणि वर्षाताईंना हवीय इम्युनिटी


बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) आजच्या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडताना दिसत आहे. जादुई दिव्यात इम्युनिटी बंदिस्त आहे. नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कोणाला मिळणार जादुई दिव्याची इम्युनिटी हे पाहावे लागेल. प्रोमोमध्ये वर्षा ताई अरबाजकडे नॉमिनेट न करण्याची विनंती करताना दिसत आहेत. तर अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केलेलं पाहायला मिळत आहे. जान्हवीला मात्र अंकिताचा हा निर्णय पटलेला नाही.


अभिजीतच्या नेतृत्वात टीम बीचा प्लॅन सफल होणार?


नॉमिनेशनच्या टास्कमध्ये जादुई दिव्याची इम्युनिटी  कोणाला मिळणार? याकडे आता बिग बॉस प्रेमींचं लक्ष लागलं आहे. वर्षाताई इम्युनिटीसाठी अरबाजची मनधरणी करताना दिसत आहेत. तर टीम बीमधील अभिजीत, अंकिता, डीपी आणि पॅडीला सुरक्षित करण्यासाठी प्लॅन बनवताना दिसत आहेत. आज नेमकं काय होणार, हे पाहावं लागणार आहे.


नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कोणाला मिळणार जादुई दिव्याची इम्युनिटी?






अरबाजच्या कॅप्टनसीवरून सगळे घेतायत त्याची फिरकी


अरबाजच्या कॅप्टनसीप्रकरणावरुन आजच्या भागात डीपी दादा, पॅडी दादा, अंकिता आणि संग्राम त्याची फिरकी घेताना दिसणार आहेत. संग्राम म्हणतोय,"याला म्हणतात पायावर दगड नाही तर दगडावर पाय मारणं". त्यामुळे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होणार आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या  :


VIDEO : अभिनेता सोहेल खानच्या आयुष्यातही पुन्हा प्रेमाची चाहूल? मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेट, रेस्टॉरंटबाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद