Bigg Boss New Season Update : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉसचा 18 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहतात. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानचे चाहते तर या शोकडे डोळे लावून बसलेले असतात. सलमान खान जेव्हा बिग बॉस होस्ट करतो तेव्हा प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित होतो. बिग बॉसच्या यंदाच्या सीझन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानने यंदाच्या सीझनच्या शूटींगला सुरुवात केली आहे. बिग बॉसचा 18 शोमध्ये यंदा किती आणि कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
बिग बॉस 18 सीझनच्या शूटींगला सुरुवात
अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बिग बॉस 18 च्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केलं असल्याची माहिती समोर आली आहे. बिग बॉस 18 चा नवीन प्रोमो अवघ्या काही दिवसात रिलीज होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यात बिग बॉस 18 चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादीही समोर आली आहे. सियासत या इंग्रजी वेबसाइटनुसार, बिग बॉस 18 मध्ये टीव्हीपासून बॉलिवूड आणि सोशल मीडियापर्यंतचे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. बिग बॉस 18 च्या संभाव्य स्पर्धकांची यादी पाहा.
बिग बॉस 18 च्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- सुधांशू पांडे
- अनिता हसनंदानी
- जान खान
- धीरज धुपर
- मीरा देवस्थळे
- सुरभी ज्योती
- अलिशा पनवार
- शाहीर शेख
- फैसल शेख
- समीरा रेड्डी
- अंजली आनंद
- चाहत पांडे
- रीम शेख
- सुनील कुमार
बिग बॉस 18 मध्ये अब्दू रोजिकही दिसणार
निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी बिग बॉस 16 सीझनमधील चर्चित स्पर्धक अब्दू रोजिक देखील बिग बॉस 18 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. अब्दू रोजिक यावेळी स्पर्धक म्हणून नाही तर सलमान खानसोबतच्या एका खास सेगमेंटसाठी होस्ट म्हणून सामील होणार आहे. यामुळे शोमध्ये एक नवीन उत्साह येईल. अब्दू रोगिकने त्याच्या सहभागाची पुष्टी केली आहे आणि बिग बॉसच्या घरात परत येण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :