Sohail Khan With Mystery Girl For Dinner Date : अभिनेता सलमान खानचा लहान भाऊ बॉलिवूड अभिनेता सोहेल खान याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची चाहूल लागल्याची चर्चा आहे. सोहेल खान आणि सीम सजदेह यांचा घटस्फोट झाला आहे. 24 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता सोहेल खानचा मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर सोहेल खान गर्लफ्रेंडसोबत डिनर डेटला गेल्याची चर्चा रंगली आहे. 


सोहेल खानच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री?


अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) सोमवारी रात्री उशिरा एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता. ज्यानंतर त्याला सीमा सजदेहसोबत घटस्फोटानंतर पुन्हा एकदा त्याला नवीन प्रेम मिळालं असल्याचं बोललं जात आहे. सीमा सजदेहपासून विभक्त झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सोहेलच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे. सोमवारी रात्री सोहेल एका मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेटवर दिसला. मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेटनंतर सोहेल रेस्टॉरंट बाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.


सोहेल खानसोबतची 'मिस्ट्री गर्ल' कोण?


9 सप्टेंबर 2024 रोजी सोहेल खान मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये एका मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेटवर दिसला. यावेळी, सोहेल निळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि तपकिरी रंगाच्या जॉगर्समध्ये दिसला. रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर सोहेलने पापाराझींना नमस्कार केला आणि नंतर त्याच्या कारमध्ये बसला. या वेळी, सोहेलच्या कारमध्ये मागे बसलेल्या एका मिस्ट्री गर्लनं लक्ष वेधलं. सोहेल मिस्ट्री गर्लसोबत खूप बोलताना दिसला. पॅप्सने या दोघांनाही आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि आता त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेटचा VIDEO व्हायरल


सोहेल खान आणि सीमा सजदेह लग्नाच्या 25 वर्षांनंतर 2022 मध्ये विभक्त झाले. या विवाहित जोडप्याचा 1998 मध्ये घटस्फोट झाला. आता घटस्फोटानंतर दोन वर्षांनी सोहेल खान पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये सोहेल खानच्या कारमध्ये एक तरुणी असल्याचं दिसत आहे. मिस्ट्री गर्लनं ब्लॅक टी-शर्ट आणि व्हाईट पँट घातल्याचं दिसत आहे. तिनं चष्मा लावलेला असून ती सोहेलसोबत हसून बोलताना दिसत आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ
 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss 18 : सलमान खानकडून शूटींगला सुरुवात, बिग बॉस 18 मध्ये 'हे' 14 स्पर्धक सहभागी होणार