Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : आज बिग बॉस मराठी भाऊचा धक्का पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खूप कल्ला पाहायला मिळाला. टास्क दरम्यान, वादही झाले आणि काही सदस्यांना दुखापतही झाली. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा आता संपणार आहे. यादरम्यान, सदस्यांना महाराष्ट्राचा धक्का मिळणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात पत्रकारांची एन्ट्री होणार आहे. पत्रकार सदस्यांना प्रश्न विचारुन भांबावून सोडली, आता यामध्ये उत्तरं देताना कोणत्या सदस्याची बोबडी वळणार हे पाहालं लागणार आहे.


 


बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडचा नवा प्रोमो समोर आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार, आज बिग बॉस मराठीच्या घरात महाराष्ट्राचा धक्का रंगणार आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांना पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. पत्रकार महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न सदस्यांना विचारणार आहेत.


 


बिग बॉसच्या घरातील सदस्यांना पत्रकारांकडून मिळणार महाराष्ट्राचा धक्का. घरातील सदस्यांवर प्रश्नांचा भडीमार होणार आहे. डीपीला प्रश्न विचारला जातो की, तुम्हाला अभिजीतचा प्रॉब्लेम आहे का? बिग बॉस शो संपल्यानंतर निक्कीसोबतच नातं तसंच राहील का? असा सवाल अरबाजला विचारला जातो. संग्रामसोबतच्या मैत्रीवरून निक्कीला प्रश्न विचारला जातो की, तुला असं वाटतंय का की, अरबाज आता घरातून बाहेर जाईल आणि आपल्याला आधाराची गरज आहे? तर, जान्हवीकडून काय चुकलं आणि सूरज कधी गेम दाखवणार? अशा पत्रकारांच्या विविध प्रश्नांना घरातील सदस्या काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


 






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


10 महिन्यात अभिनेत्रीने 9 कोटी फी वाढवली, तरीही चित्रपटांच्या भरभरुन ऑफर; पहिल्याच चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे चर्चेत