Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पहिलं एविक्शन झालं आहे. बिग बॉसच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान, निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली, त्यानंतर आर्यानं निक्कीला मी तुला मारीन असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली.
बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री?
बिग बॉसच्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांनी आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही, पण तिला तिची चूक समजावण्याचा प्रयत्न केला. यानंतर आर्याला तिची चूक समजली आणि तिने निक्की, बिग बॉससह महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. यानंतर बिग बॉसने आर्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने अंतिम निर्णय जाहिर करत आर्याला घराबाहेर काढलं.
गेममध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता
आर्या जाधवला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाही. बिग बॉस मराठीचे प्रेक्षक या निर्णयाच्या विरोधात आहेत. दरम्यान, आर्याला आता घराबाहेर काढलं असलं तरी, आर्याची बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामागची काही कारणं आहे. पहिलं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या रितेश भाऊंच्या स्टेजवर आली नाही. घरातून बाहेर पडल्यावर तिला दाखवण्यात आलेलं नाही.
दुसरं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातील आर्याच्या नावाची पाटी अद्यापही आहे, त्यामुळे आर्या बिग बॉसच्या घरात पुनरागमन करेल, अशी प्रेक्षकांना आशा आहे. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आर्या जरी चुकली असली तरी, संपूर्ण महाराष्ट्र आर्याला सपोर्ट करताना दिसत आहे. बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा शो आहे असं रितेश भाऊ सांगतात, त्यानुसार प्रेक्षकांची इच्छा आहे की, आर्याने बिग बॉसमध्ये खेळावं. त्यामुळे आता बिग बॉस प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करुन आर्याला पुन्हा घरात एन्ट्री देणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :