Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी सीझन 5 ला सुरुवात झाली असून वादाची ठिणगी पडली आहे. बिग बॉस मराठी पाचव्या सीझनच्या पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिचा खरा अवतार इतर स्पर्धकांसमोर आला आहे. नवीन सीझनच्या पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळी आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) चर्चेत आहेत. पहिल्याच दिवशी या दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.
"तंगड्या वर करुन कॅमेऱ्यासमोर झोपते"
बिग बॉसच्या घरातील नियम मोडल्याने निक्कीने वर्षा उसगांवकर यांच्यासोबत वाद घातला. आधी मेकअप करण्यावरुन आणि त्यानंतर बेडवर झोपण्यावरुन निक्की आणि वर्षा यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉसचा नियम मोडल्याने इतर स्पर्धकांना आठवडाभर जमिनीवर झोपायला लागणार आहे. यावरुन निक्कीने वर्षा यांच्यासोबत वाद घातला, पण यावेळी निक्कीने हमरी-तुमरीची भाषा वापरली. वर्षा उसगांवकर यांच्यासोबत बोलताना निक्कीची जीभ घसरली, तिने अरे-तुरे म्हणत वाद घालत, वर्षा यांच्या कॅरेक्टरवर बोट ठेवतं त्यांची अक्कल काढली.
निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान
बिग बॉस मराठीच्या घरातील निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता अभिनेत्री प्रणित हट्टे हिने देखील प्रतिक्रिया देत तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रणित हट्टेने म्हटलं आहे की, "निक्की तांबोळी ज्याप्रकारे वर्षा मॅमसोबत बोलत होती, ते फार चुकीचं होतं. ती निक्की जी कुणी असेल, पण आपल्या सीनियर्स बरोबर कसं बोलायचं-वागायचं याचं भान तिने राखायला हवं होतं."
रितेश देशमुख काय भूमिका घेणार?
प्रणित हट्टेने व्हिडीओमध्ये पुढे म्हटलं आहे की, "दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही पूर्ण भाग पाहिला असेल, तर फक्त वर्षा मॅमच नाही, तर इतर अनेक स्पर्धक होते, जे बेडवर आणि सोफ्यावर बसले होते. तिसरी गोष्ट म्हणजे, तंगड्या वर करुन कॅमेऱ्यासमोर झोपते, हे बोलणं किती किळसवाणा प्रकार आहे. आता रितेश देशमुखची यावर काय प्रतिक्रिया असेल, हे मला बघायचं आहे. कारण, बिग बॉसच्या घरात सीनियर्सना असं रडताना आणि चुकीच्या पद्धतीने वागणूक देताना पाहिलं की खूप वाईट वाटतं, यासाठी कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, पण इतर सर्वजण तिथे तोंड बंद करुन बसले होतं", असंही तिने म्हटलं आहे.