Bigg Boss Marathi 4बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरामधून काल त्रिशूल मराठेला घराबाहेर पडावे लागले. आज त्याच्याविषयी अपूर्वा आणि अक्षय चर्चा करताना दिसणार आहेत. अपूर्वा अक्षयला त्रिशूलविषयी काही गोष्टी सांगताना दिसणार आहे. आणि तेच सांगताना तिला अश्रू अनावर झाले.

Continues below advertisement


"त्याच्याबरोबर ना एक वेगळी बॉण्डिंग होती” असं अपूर्वा अक्षयला सांगताना दिसणार आहे. अक्षयचे म्हणणे आहे, "त्रिशूल हक्काचा व्यक्ती होता." अपूर्वा म्हणाली, "हो हक्काचा एक व्यक्ती यार. मी त्याचं वाक्य कधीच नाही विसरणार, तो मला काय म्हणाला धोंगडे तुझ्याबाबतीत असं बोली ना नेक्स्ट डे मी तिच्याशी बोलायला गेलो मी तिला सांगितलं तू चुकते आहेस तू एकदा अपूर्वाला जाणून घे ती तशी नाहीये जशी तुला दिसते आहे... ती वाटते तशी. पण, तिच्याशी बोलायला लागशील ना तेव्हा तुला लक्षात येईल she is a funny person. आणि हे ना नकळतपणे तो माझ्याविषयी बोलत होता आणि मला ते इतकं भारी वाटतं होतं. असं कोणीच नाही बोल आहे माझ्याशी. मला आता खूप एकटं वाटतं आहे.” अक्षय म्हणाला, “एकटं नाही वाटून घ्यायचं मी आहे ना अजून. अपूर्वा म्हणाली, इथे खूप hatred आहे माझ्यासाठी...”


 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज (7 नोव्हेंबर)  रंगणार 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य. कार्यात टीम A विरुध्द्व टीम B अशी एक निवडणूक होणार आहे. "विषय END" या नॉमिनेशन कार्यात कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.






वाचा महत्वाच्या बातम्या: 


Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरातून कॉमन मॅनची एक्झिट; त्रिशूल मराठे पडला घराबाहेर