Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची क्रेझ आता कमी झाली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा कार्यक्रम मागे पडला आहे. अशातच त्रिशूल मराठे (Trishul Marathe) बिग बॉसच्या घरातून आऊट झाला आहे. 


बिग बॉसच्या घरात नेहमीच स्पर्धक म्हणून सेलिब्रिटी सहभागी होत असतात. पण या पर्वात पहिल्यांदाच सामान्य नागरिक म्हणून त्रिशूल मराठे सहभागी झाला होता. त्यानिमित्ताने एका सामान्य चाहत्याला पहिल्यांदाच बिग बॉसचा खेळ खेळण्याची संधी मिळाली होती. 


त्रिशूलने पहिल्याच दिवशी महेश मांजरेकरांचं मन जिंकलं होतं. पण मागच्या काही दिवसांत तो कमी खेळताना दिसून आला. एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावं लागत आहे, असं म्हणत मांजरेकरांनी त्रिशूलचा निरोप घेतला. त्रिशूलसारखा लकी प्रेक्षक बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्याचा मांजरेकरांना आनंद झाला होता. 






त्रिशूल मराठे सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. बिग बॉसच्या घरात तो सामान्य प्रेक्षक म्हणून सहभागी झाला असला तरी आता मात्र तो सेलिब्रिटी झाला आहे. त्रिशूलला अभिनयाची आवड असल्याने त्याला लवकरच अनेक सिनेमांसाठी विचारणा होऊ शकते. 


एअरटेल लकी कॉलरच्या माध्यमातून त्रिशूल मराठेला बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होता आले होते. बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात मांजरेकरांचं मन जिंकणारा त्रिशूल दुसऱ्या आठवड्यापासूनच घरात दिसेनासा झाला होता. चावडीवर मांजरेकरांनी त्याला यासंदर्भात माहिती दिली होती. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : सर्वाधिक लगोरीचे थर कोण रचणार? स्पर्धकांमध्ये पार पडणार कॅप्टीन्सीचे कार्य