Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी सीझन 4 (Bigg Boss Marathi 4) चा फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच घरात वेगवेगळे रंजक टास्क पाहायला मिळतायत. घरात आता एकूण सात स्पर्धक बाकी आहेत. या सातही स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळतेय. काल झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत काही स्पर्धक नॉमिनेट झाले तर काही थेट फिनालेमध्ये पोहोचले आहेत. यामुळे घरात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतंय.


नुकताच घरात एक वाद झाला आहे. या वादात अक्षयच्या बेडवर घरातील एका स्पर्धकाने अंड फोडून टाकलं आहे. यावरून अक्षय घरातल्या स्पर्धकांना जाब विचारताना दिसतोय. हा स्पर्धक नेमका कोण आहे? याबाबत मात्र, उत्सुकता आहे. मात्र, घरातील स्पर्धकांचा रोष राखी सावंतवर आहे. तसेच, अक्षयलाही राखीवर संशय असल्या कारणाने घरात राखी आणि अक्षयमध्ये वाद होतात. 


पाहा व्हिडीओ : 






या वादात अक्षय राखीवर निशाणा साधतो. तसेच, राखीला जाब विचारताना दिसतो. मात्र, राखी या गोष्टीला नकार देते. मात्र, राखीला हे काम कोणी केलं आहे ते माहित आहे. आता तो सदस्य नेमका कोण आहे? तसेच, या सगळ्यात राखीचा तर हात नाही? या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


'हे' स्पर्धक पोहोचले फिनालेमध्ये 


बिग बॉसच्या घरात नुकतेच या आठवड्याचे नॉमिनेशन पार पडले. या नॉमिनेशनमध्ये घरातील स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. तर, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे स्पर्धक घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले तर किरण माने, अपूर्वा नेमळेकर, आरोह वेलणकर, अक्षय केळकर हे सदस्य फिनालेमध्ये पोहोचले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Gandhi Godse Ek Yudh : 'गांधी-गोडसे एक युद्ध' सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट; नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार चिन्यम मांडलेकर