Gandhi Godse Ek Yudh Chinmay Mandlekar : 'गांधी-गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर या सिनेमात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका नक्की कोण साकरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे. 


अभिनेता चिन्मय मांडलेकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आजवर चिन्मय वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे तो चर्चेत असतो. आता 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमात तो नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी शरद पोंक्षे यांनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती. 






चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत तर महात्मा गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता दीपक अंतानी दिसणार आहेत. गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, ऐश्वर्या राय आणि तुषार कपूर हे कलाकारदेखील झळकणार आहेत. 


राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाच्या माध्यमातून नऊ वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. राजकुमार यांनी 80 चं दशक चांगलच गाजवलं आहे. आता नऊ वर्षांनी एक नवा कोरा सिनेमा घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 


बॉक्स ऑफिसवर 'पठाण' अन् 'गांधी-गोडसे एक युद्ध' आमने-सामने


शाहरुख खानचा आगामी 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर 'गांधी-गोडसे एक युद्ध' हा सिनेमा 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने येणार आहेत. आता कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे. 


संबंधित बातम्या


Gandhi Godse Ek Yudh : राजकुमार संतोषीचं नऊ वर्षांनी दमदार पुनरागमन; 'गांधी-गोडसे एक युद्ध' सिनेमाची घोषणा