Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घराचा आज नीथा शेट्टीला निरोप घ्यावा लागला आहे. आज बालदिन असल्याने बिग बॉसच्या घरातदेखील बालदिन साजरा झाला. बालदिनानिमित्त दोन चिमुकल्या सदस्यांनी आज बिग बॉसच्या घरातील सदस्यांची भेट घेतली. जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कृष्णप्पा आणि सोमनाथ या दोघांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. 


आजच्या भागात सदस्यांनी एकमेकांना लहानपणीच्या गोड आठवणी सांगितल्या. सदस्यांनी नकलादेखील केल्याने बिग बॉसची चावडी रंगली. दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीत प्रेक्षकांची अतरंगी डिमांडदेखील पूर्ण केली. 
या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल शनिवारी जय, विशाल, आणि दादूस सेफ झाले होते.  


नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघां जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. नीथा आणि सोनाली हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले असल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितले. दरम्यान महेश मांजरेकरांनी सांगितले यंदाच्या आठवड्यातून नीथा शेट्टीला बिग बॉसच्या घरामधून बाहेर जावे लागेल. 


बिग बॉसच्या यंदाच्या आठवड्यात घरातील सदस्य चांगले खेळले असल्याने मांजरेकर सदस्यांचे कौतुक करताना दिसले. तर दुसरीकडे मांजरेकरांनी घरातील सदस्यांची शाळा घेतली. घरातील सदस्यांना मांजरेकरांनी चांगलेच सुनावले. त्यामुळे येत्या आठवड्यात मांजरेकरांच्या सुचनांचे पालन घरातील सदस्य कसे करतील हे पाहणे रंजक असणार आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 15 : बिग बॉसच्या मंचावर आज Salman Khan आणि Rani Mukerji एकत्र, मोठी धमाल होणार


Bigg Boss 15: Jay Bhanushali वर भडकला Salman Khan, म्हणाला... तु बिग बॉसच्या घरात नसलास तरी फरक पडत नाही


आता अजय देवगणच्या 'सिंघम 3' ची प्रतिक्षा, Rohit Shetty पुढच्या वर्षी चित्रिकरणाला सुरुवात करणार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha