Bigg Boss Marathi 3 : आज बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार ही 'पाइपलाईन तुटायची नाय' हे साप्ताहिक कार्य पार पडणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालचा दिवस थोडा भावुक होता. तर काही खास पाहुणे सदस्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात गेले होते.


मीरा आणि उत्कर्षने कालच्या टास्कमध्ये बाजी मारली. तर टेमटेशन रुममध्ये जाणारा उत्कर्ष हा शेवटचा सदस्य ठरला. पण त्याची किंमत मीराला चुकवावी लागली. आजच्या टास्कमध्ये विकास आणि विशालमध्ये पुन्हाएकदा जबरदस्त राडा होणार आहे. घरातील समीकरण बदलताना दिसत आहे. तात्या यांच्या स्पेसशिपचे इंधन संपले आहे, प्रत्येक सदस्याला त्यांच्या टीममधील सदस्यांच्या मदतीने स्पेसशिपमध्ये इंधन भरायचे आहे, असा आजचा टास्क असणार आहे. याच टास्क दरम्यान  विकास आणि विशालमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे.





बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची होणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार ही 'पाइपलाईन तुटायची नाय' हे साप्ताहिक कार्य. याच कार्या दरम्यान सोनाली आणि विकासचे भांडण होणार आहे. सोनालीला असं वाटतं आहे, विकास तिच्यासाठी खेळला नाही. त्यावर विकास त्याची बाजू मांडताना दिसणार आहे. पण सोनाली विकासचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही, असं दिसून येत आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha