Bigg Boss Marathi 3 : आजपासून बिग बॉसच्या घरात नवे टास्क होणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामधून काल स्नेहा वाघ घराबाहेर पडली. आजपासून बिग बॉसच्या घरात नवे टास्क रंगणार आहेत. बिग बॉस आज घरातील सदस्यांना कठीण टास्क देणार आहेत. 


बिग बॉस आज घरातील स्पर्धकांना सांगणार आहेत, मुंबई शहर कधीच झोपत नाही. त्यामुळे या आठवड्यात घरातील सर्व सदस्यांना जागं राहावं लागणार आहे. बिग बॉसने हे जाहीर करताच घरातील सदस्यांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे उत्कर्ष गाणं म्हणतो आहे,"मुझे निंद क्यु आये, कोई मुझको अब ये बताये... के ऐसा कैसा टास्क आगया".





बिग बॉसच्या घरात आज विकास आणि विशाल स्नेहा वाघबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. आता या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन एक्सप्रेस हा टास्क रंगणार आहे.





 संबंधित बातम्या


Jersey Poster : Shahid Kapoor च्या 'जर्सी' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Bigg Boss Marathi 3 : स्नेहा वाघने घेतला बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप


Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेचा 'जलवा' आता हिंदी 'बिग बॉस'मध्ये, वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर सलमानही चक्रावला