Sherlyn Chopra : Sameer Wankhede यांना शर्लिन चोप्राचा पाठिंबा

Sherlyn Chopra Support Sameer Wankhede : समीर वानखेडेंने पाठिंबा देण्सासाठी बॉलिवूडची अभिनेत्री शर्लिन चोप्रा पुढे आली आहे.

Continues below advertisement

Sherlyn Chopra Support Sameer Wankhede : आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्ज प्रकरण रोज नवीन वळणांचा सामना करत आहे. बॉलिवूडचे अनेक बडे कलाकार शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास घेणारी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना समर्थन देताना दिसून आली. तिने त्यांच्या प्रामाणिकपणे काम करण्याचे कौतुकदेखील केले. शर्लिनच्या मते, क्रूझ ड्रग्ज प्रकरण लवकरात लवकर संपवण्यात आले पाहिजे नाहीतर युवा पिढीवर वाईट संस्कार होतील. समीर वानखेडे योग्यरितीने काम करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. 

Continues below advertisement

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपावर शर्लिन चोप्राने केले प्रश्न उपस्थित

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपावर शर्लिन चोप्रा म्हणाली,"समीर वानखेडे त्याचं काम करत आहेत. युवा पिढीच्या भल्यासाठी त्यांच्यावर कोणतीही बंधन न लादता त्यांना काम करू दिले पाहिजे. तसेच तसेच तरुणांनी नशा करणं टाळायला हवं. समीर वानखेडेंचे मॅरेज सर्टिफिकेट आणि ड्रग्ज प्रकरण याचा संबंध काय?" 

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं, जर इतिहास काढला तर लक्षात येईल हमाम में सब नंगे है : जितेंद्र आव्हाड

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या 50 कोटी रुपयांसदर्भात शर्लिन म्हणाली, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने शर्लिनकडे 50 कोटी रुपयांची नोटिस पाठवली आहे. त्यावर शर्लिनने प्रतिउत्तरदेखील दिले आहे. शर्लिन म्हणाली, पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राने आणि शिल्पा शेट्टीने ते सर्व आरोप मागे घेण्यासाठी 50 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यावर शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला नोटीस पाठवली आहे. त्यात शर्लिनने मानसिक त्रास दिल्यासंबंधी 75 कोटींची मागणी केली आहे. 

मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन : नवाब मलिक

पहिल्या पत्नीशी निकाह करताना समीर वानखेडे मुस्लिम, वानखेडेंचं पहिलं लग्न लावणाऱ्या काझींचा दावा

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola