Bigg Boss Marathi Task : बिग बॉसच्या घरात सुरू असलेला "जिंकू किंवा लढू" हा साप्ताहिक टास्क काल संपला. या टास्कमध्ये टीम A विजयी ठरली आहे. नियमानुसार या विजेत्या टीमच्या सदस्यांना आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार आहे. बिग बॉसने घोषित केले आहे, या टीममधील सदस्यांनी विचारविनिमय करून दोन सदस्यांची नावे कॅप्टनसीसाठी द्यावी. बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन पद मिळताच अनेक जबाबदाऱ्या देखील येतात. त्यानुसार टीम A मधील प्रत्येक सदस्य कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कसा योग्य आहे हे सांगू लागले. ज्यांना कॅप्टन होण्याची इच्छा आहे त्यांनाच उमेदवारी मिळावी हे स्पष्ट करू लागले. पण प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले आहे, टीम A एकमताने निर्णय घेण्यास असमर्थ ठरली आहे, त्यामुळे आता ही संधी टीम B ला मिळत आहे. 


आज बिग बॉसच्या घरात रंगणार आहे "डान्स पे चान्स" कॅप्टनसी टास्क. त्यामुळे पुढील आठवड्याचा कॅप्टन कोण होणार ते आजच्या भागात कळणार आहे. घरातील सदस्यांनी या टास्कसाठी एकसे बढकर एक गेटअप केले आहे. अक्षय वाघमारे-दादुस, अविष्कार दारव्हेकर-मीनल शाह, गायत्री दातार-उत्कर्ष शिंदे, सोनाली पाटील-मीरा जगन्नाथ, तृप्ती देसाई-स्नेहा वाघ-विकास पाटील या जोड्यांमध्ये टास्क रंगणार आहे. अविष्कार आणि दादूस बिग बॉसच्या घरातले सलमान खान आणि गोविंदा असणार आहेत. तसेच ते वेगवेगळ्या चित्रपटांच्या गाण्यांवर देखील डान्स करणार आहेत. 


बिग बॉसच्या घरात सदस्य त्यांना खटकणाऱ्या गोष्टी सगळ्यांपुढे न मांडता जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करत असतात. आजच्या भागात सुरेखा कुडची त्यांच्या मनातील एक महत्त्वाची गोष्ट स्नेहा आणि जयला सांगताना दिसून येणार आहेत. सुरेखा ताई स्नेहा आणि जयला सांगणार आहेत, "जेवण बनवताना उत्कर्ष, गायत्री, मीरा, स्नेहा होती. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही ठरवून आम्हा चौघांना नॉमिनेट केले आहे.
 
आम्ही तुमच्या दृष्टीने विक आहोत. टास्क आला की तुम्ही विचार करता की आम्ही टास्क खेळू शकत नाही. तुम्ही युक्ती वापरता पण त्या युक्तीचा वापर कधीच केला जात नाही. युक्तीपेक्षा शक्तीचाच वापर जास्त केला जातो. जिथे आम्ही कधीच पडणार नाही. किचन एरियाला शून्य किंमत आहे. कितीही प्रेमाने करून घाला, जिवाचं रान करा त्याला किंमत नाही. त्याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडू"


आजच्या भागात टीम B मधून घराचा नवीन कॅप्टन कोण होणार ते कळणार आहे. तर टीम A मधील सदस्य चर्चा करताना दिसून येणार आहेत. त्यात जय त्याचा मुद्दा मांडणार आहे,"आपण जर असे वाद करणार असू तर आपण जे आता म्हणतो आहे की मी समजूतदार वैगरे तर आपण बाहेरच्या सहा जणांना कसे सांभाळणार?