Zee Marathi Nomination 2021 : झी मराठीचा गौरवसोहळा नेहमीच कलाकांरांसह प्रेक्षकांनादेखील आपलासा वाटतो. झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरवसोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत असतो. यंदा देखील हा सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न होणार आहे. कारण यावर्षी नव्या नात्यांच्या बांधू गाठी म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नव्या मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. या नवीन कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्यांत पुरस्कार कोण पटकावणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. 

झी मराठीच्या गौरव पुरस्कार सोहळ्याची आता नामांकन जाहीर झाली आहेत. मालिका, नायक, नायिका, खलनायक, खलनायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, स्त्री व्यक्तिरेखा, सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष, सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री अशा सगळ्यांना नामांकन जाहीर झाली आहेत. झी मराठीवर सध्या उत्तम कथानकाचे, उत्कृष्ट सादरीकरण होत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रेक्षकांना झी ने टार्गेट केले आहे. त्यामुळेच त्या पद्धतीच्या मालिका घेऊन झी प्रेक्षकांसाठी पुढे सरसावले आहे. जाणून घ्या यंदा पुरस्कार कोण पटकावणार?

सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी घेतला वसा टाकू नको, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, ती परत आलीये, येऊ कशी तशी मी नांदायला, रात्रीस खेळ चाले 3, मन झालं बाजिंद, माझी तुझी रेशीमगाठ, मन उडु उडु झालं या मालिकांना मालिकांना नॉमिनेशन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट नायकासाठी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश, मन उडु उडु झालं मालिकेतील इंद्रा, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील सिद्धार्थ, मन झालं बाजिंद मालिकेतील राया, येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील ओम, रात्रीस खेळ चाले 3 मालिकेतील अभिरामला नॉमिनेशन मिळाले आहे. तर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहा, येऊ कशी तशी नांदायला मालिकेतील स्वीटू, मन उडु उडु झालं मालिकेतील दिपू, मन झालं बाजिंद मालिकेतील कृष्णा, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील आदिती, रात्रीस खेळ चाले 3 मालिकेतील कावेरीला सर्वोत्कृष्ट नायिकेसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. 

झी मराठीवरील खलनायक आणि खलनायिकादेखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. तसेच तितकेच लोकप्रिय होत असतात. त्यामुळे सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी रात्रीस खेळ चाले 3 मालिकेतील अण्णा नाईक, येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोहित, मन झालं बाजिंद मालिकेतील हृतिक, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परांजपे वकीलाला नॉमिनेशन मिळाले आहे. तर सर्वोत्कृष्ट खलनायिकेसाठी मन झालं बाजिंद मालिकेतील गुली मावशी, रात्रीस खेळ चाले 3 मालिकेतील शेवंता, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील महालक्ष्मी, मन उडु उडु झालं मालिकेतील स्नेहलता, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील सिम्मी, येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मालविकाला नॉमिनेशन मिळाले आहे. 

सर्वोत्कृष्ट जोडीदिपू आणि इंद्रा - मन उडु उडु झालंअदिती आणि सिद्धार्थ - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!कावेरी आणि अभिराम - रात्रीस खेळ चाले 3कृष्णा आणि राया - मन झालं बाजिंदनेहा आणि यश - माझी तुझी रेशीमगाठशेवंता आणि अण्णा - रात्रीस खेळ चाले 3स्वीटू आणि ओम - येऊ कशी तशी मी नांदायला

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुषअभिराम नाईक - रात्रीस खेळ चाले 3सत्या - ती परत आलीयेदेशपांडे सर - मन उडु उडु झालंजग्गनाथ चौधरी (जग्गू आजोबा) - माझी तुझी रेशीमगाठसमीर - माझी तुझी रेशीमगाठबंडू काका - माझी तुझी रेशीमगाठमोहित - येऊ कशी तशी मी नांदायलातात्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!विकी - ती परत आलीयेबाबुराव तांडेल- ती परत आलीयेमुंज्या - मन झालं बाजिंददादा साळवी - येऊ कशी तशी मी नांदायला

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्रीआशा मामी - मन झालं बाजिंदसानिका - मन उडु उडु झालंशकू - येऊ कशी तशी मी नांदायलागुली मावशी - मन झालं बाजिंदसायली - ती परत आलीयेनलू - येऊ कशी तशी मी नांदायलाकावेरी - रात्रीस खेळ चाले 3मालविका - येऊ कशी तशी मी नांदायलामाई - रात्रीस खेळ चाले 3बंडू काकू - माझी तुझी रेशीमगाठ

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषसत्तू - मन उडु उडु झालंघारतोंडे - माझी तुझी रेशीमगाठअप्पा - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!सुहास - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!सयाजी - रात्रीस खेळ चाले 3बाळा काका- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!पप्या - मन झालं बाजिंदसोनटक्के - मन उडु उडु झालंबापू काका - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!टिकाराम - ती परत आलीयेचिन्या - येऊ कशी तशी मी नांदायलासोपान मामा - मन झालं बाजिंददत्ता नाईक - रात्रीस खेळ चाले 3शरद काका - येऊ कशी तशी मी नांदायलानाना काका - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!मिलिंद - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!रॉकी - येऊ कशी तशी मी नांदायलाहृतिक - मन झालं बाजिंदहणम्या - ती परत आलीयेविश्वजीत - माझी तुझी रेशीमगाठ

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्रीअनुजा - ती परत आलीयेमालती - मन उडु उडु झालंअंतरा - मन झालं बाजिंदपल्लू काकी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!अर्चना - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!सुमन काकी - येऊ कशी तशी मी नांदायलाशलाका - मन उडु उडु झालंबयोबाई - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!नेहाची वहिनी - माझी तुझी रेशीमगाठमैथिली - येऊ कशी तशी मी नांदायलारत्नाक्का - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!सरिता - रात्रीस खेळ चाले 3रोहिणी - ती परत आलीयेसुशल्या - रात्रीस खेळ चाले 3नानी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!ताई काकी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!शेफाली - माझी तुझी रेशीमगाठ