Ankita Walavalkar:बिग बॉसच्या घरात आपल्या खास मैत्रीनं पोचलेल्या कोकण हार्टेड गर्ल आणि विजेता ठरलेला सुरज चव्हाण यांच्या नात्यात आता काहीतरी बिनसल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर अंकिताला अनफॉलो करणं, तिच्याशी केलेले कोलाब्रेटिव्ह व्हिडिओ काढून टाकणं अशा अनेक कारणांनी गेल्या काही दिवसांपासून सुरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर चर्चेत आहेत. नुकतीच अंकिता सुरजच्या गावी जाऊन आली. गावी तिला मिळालेल्या वागणुकीवर तिनं नाराजी व्यक्त करत या सगळ्या दलदलीत आता तिला पडायचं नसल्याचं व्हिडिओ शेअर करत जाहीर केलं आहे. 


घरात भेटलेला सुरज आणि बाहेर आल्यानंतरचा सुरज हे दोघं वेगवेगळे असल्याचे सांगत लोक सांगतील तसं सुरज वागतोय. सुरजच्या मनात बाहेरच्यांनी माझ्याविषयी अनेक गोष्टी भरवल्या आहेत. माझाही वेगळा फॅन बेस आहे. या प्रकरणात माझं मत माझ्याच हातांना कळावं यासाठी हा व्हिडिओ केल्याचं अंकिताने सांगितलं. 


तासाभरात पोहोचतोय सांगितल्यावरही निघून गेला


सुरज ला भेटायला त्याच्या गावी अनेक कलाकार येऊन गेल्यानंतर तू काय येत नाहीस असा त्याचा फोन आल्यानंतर मी जाऊन आले. जाण्याचा आधी त्याला फोनही केला होता. तासाभरात पोहोचू असं सांगितलेलं असतानाही तो आंघोळ करण्यासाठी निघून गेला. वापस आल्यानंतर गावातल्या लोकांनीही सुरज आला उठा उठा उभे रहा.. असं म्हणले. याचं मला खूप आश्चर्य वाटत होतं. त्याची परवानगी घेऊन आम्ही भेटायला त्याला घरात गेलो. हा सुरज नाही. हे त्याचं डोकं नाही. आपल्यासाठी कुणीतरी आलाय इतक्या वेळ थांबलाय असं कळताच अरे अंकिता ताई आली असं म्हणत तो भेटायला आला असता. असं अंकिता म्हणाली.


 



आता मी या सगळ्यातून लांबच राहिलेली बरी 


सुरजचं मला चांगलंच करायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जर सुरज माझा ऐकायला लागला तर मी त्याला सेट करून पाठवीन या भीतीने मला यात अडकवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे आता मी या सगळ्यातून लांबच राहिलेली बरी असं म्हणत अंकिताने सुरजशी नंतर झालेल्या एका संभाषणाची क्लिपही व्हिडिओत दाखवली. 


Instagram वर अनफॉलो केलं, व्हिडिओही काढून टाकले 


सुरजच्या घरी जाऊन आल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी त्याला कोलाब्रेशन टाकलं होतं. दोन-तीन पोस्ट साठी व्हिडिओ साठी टॅग केलं होतं. त्याच्याकडून माझ्यासाठी कोणतेही पोस्ट टाकली गेली नव्हती. आधी त्यांनी कोलाब्रेशन स्वीकारलं. मग लगेच ते काढून टाकलं. मला हे माहितही नव्हतं. मला लोकांचे मेसेज आल्यानंतर मला हा प्रकार कळाला. मला इंस्टाग्रामवरूनही त्यांना काढून टाकलं होतं. लोक बोलायला लागली म्हणून पुन्हा फॉलो केलं. या गोष्टीचा फार उद्रेक होताना दिसल्याने हा प्रकार शांत व्हावा म्हणून जान्हवी सोबतचे पण सगळे कोलॅब्रेशन काढले. एक खोटं बोललं की लपवायला अनेकदा खोटं बोलावं लागतं.


हेही वाचा: