Bigg Boss 18 Host Update : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉसकडे प्रेक्षक नजरा लावून बसले आहेत. बिग बॉस सीझन 18 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस ओटीटी 3 सीझन संपल्यापासून चाहत्यांना नवीन सीझनची उत्सुकता लागली आहे. छोट्या पडद्यावरील विवादीत आणि तितकाच प्रसिद्ध शो बिग बॉसचा मोठा चाहतावर्ग आहे. सलमान खानचे चाहते भाईजानला पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, सलमान खान यंदा बिग बॉस शो होस्ट करणार नाही. पण, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.


बिग बॉस 18 बाबत मोठी अपडेट समोर


सलमान खान बिग बॉसच्या या सीझनचे सूत्रसंचालन करणार नसल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पसरल्याचं चित्र दिसून आलं. पण, आता या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, सलमान खान शो होस्ट करत नसल्याच्या सर्व बातम्या या अफवा आहेत. सलमान खान बिग बॉस शोचा एक महत्त्वाचा भाग असून तोच शो होस्ट करणार आहे. 


वृद्ध महिला फॅनने घेतली सलमान खानची भेट


बिग बॉसच्या सेटवरील सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका वृद्ध महिलेला भेटताना आहे. ही वृद्ध महिला सलमानची फॅन असून त्याला खूप प्रेम आणि आशीर्वाद देत आहे. सलमान खानही त्या महिलेला खूप प्रेमाने भेटताना दिसत आहे. हा व्हिडीओ 'बिग बॉस 18' च्या सेटच्या बाहेरचा आहे, जिथे सलमान खान प्रोमो शूट करण्यासाठी पोहोचला होता. सलमान खान कारमधून उतरून सेटच्या दिशेने जाताना ही वृद्ध महिला त्याला भेटते. दोघांमधील गोड संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


बिग बॉसच्या सेटबाहेरील सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल






बिग बॉस 18 केव्हा सुरु होणार?


सलमान खानचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. दरम्यान, सलमान खानचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो बिग बॉस होस्ट करणार नसल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. नुकताच सलमान 'बिग बॉस 18' च्या सेटवर पोहोचला होता. लवकरच बिग बॉसचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे पाहण्यासाठी बिग बॉसप्रेमी खूप उत्सुक आहेत. ऑक्टोबरच्या अखेरील बिग बॉसचा नवा सीझन सुरु होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gautami Patil : "मी बिग बॉसमध्ये जाणार होते, पण..."; सबसे कातिक गौतमी पाटीलनं सांगितलं ऑफर नाकारण्याचं कारण!