Anita Hassanandani Struggle Story : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली अनिता हसनंदानी आता 'सुमन इंदोरी' या नवीन मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. एका मुलाखतीत अनिताने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. अनिताने तिचे पूर्वीचे रिलेशनशिप्स आणि इंडस्ट्रीमधील संघर्षाबद्दल खुलासा केला आहे.


प्रेमासाठी करिअरवर सोडलं पाणी


अनिता हसनंदानी हिने यावेळी सांगितलं की, प्रेमासाठी करिअरवर पाणी सोडणं ही, तिची सर्वात मोठी चूक होती. अनिता एजाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. एजाज खानसोबतचे तिचं रिलेशनशिप एक टर्निंग पॉइंट होतं, असं अनिताने कबूल केलं आहे. या नात्यामुळे तिला खूप काही शिकायला मिळालं. पण, या नात्यासाठी करिअरचा महत्त्वाचा वेळ वाया घालवल्याची खंत तिने यावेळी व्यक्त केली आहे. 


बॉयफ्रेंडकडून मिळाला धोका


अनिता हसनंदानी अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली असून ती बॉलिवूड चित्रपटातही झळकली आहे. मात्र, एजाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये असताना ती एवढी गुंतली होती की, तिने चित्रपटाची संधी धुडकावली. अनिताने साऊथच्या एका सुपरहिट चित्रपटाची ऑफर नाकारल्याचं सांगितलं.


अभिनेत्रीला आता होतोय पश्चात्ताप


अनिता म्हणाली की, एजाजने तिला कधीही काम करण्यापासून रोखलं नाही, पण त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिला खूप विचार करण्याची सवय लागली होती, ज्यामुळे तिच्या करिअरमधील महत्त्वाचा वेळ वाया गेला, याचा तिला आता पश्चात्ताप होतोय, हेही अनिताने कबूल केलं. जेव्हा-जेव्हा तिचा रिलेशनशिपमध्ये विश्वासघात झाला, तेव्हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. प्रत्येक वेळी रिलेशनशिपमध्ये असताना ही व्यक्ती आपली जीवनसाथी बनेल असं तिला नेहमी वाटायचं, पण असं कधीच घडलं नाही.


अनिताने यावेळी एजाजला शुभेच्छा दिल्या आणि त्याला एक चांगला जोडीदार मिळावा आणि तो आनंदी राहो, अशी इच्छा व्यक्त केली आहे. अनिताने 2013 मध्ये अभिनेता रोहित रेड्डीशी लग्न केलं, या दोघांना एक गोड मुलगा आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनिता हसनंदानी हे प्रसिद्ध नाव आहे. ती घराघरांत पोहोचली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Biggest Bollywood Disaster Movie 2024 : या वर्षातील डिजास्टर चित्रपट, 350 कोटी खर्च करुनू फ्लॉप ठरले, तीन दिग्गज स्टार्सची चमक फिकी