Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री, कोण कोण होणार सहभागी? 'बिग बॉस 18' चा ग्रँड प्रिमिअर

Advertisement

Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates :बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनला सुरुवात झाली असून घरात कोण कोण जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

जयदीप मेढे Last Updated: 06 Oct 2024 11:18 PM
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री, गाजवणार भाईजानचा शो

Bigg Boss 18 :  गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या 18 व्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता त्यांच्या येण्याने काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Continues below advertisement
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : चाहत पांडेनंतर दोन स्पर्धकांची घरात एंट्री

Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : चाहत पांडेनंतर लगेचच दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पर्धकांनीही घरात प्रवेश केला आहे. घरात शहजादा धामी आणि अविनाश मिश्रा गेले आहेत. दोघेही टीव्ही कलाकार आहेत. शहजादा धामी 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये दिसला आहे, तर अविनाश मिश्राने तितलीसारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे.

पार्श्वभूमी

Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : बिग बॉस ओटीटी त्यानंतर बिग बॉस मराठीनंतर आता प्रेक्षकांना बिग बॉसच्या 18 व्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. बहुप्रतिक्षित बिग बॉसच्या 18 (Bigg Boss 18 Live Updates) व्या सीझनमध्ये कोण कोण सहभागी होणार याची उत्सुकता मागील अनेक दिवसांपासून होती. यासाठी अनेक नावंही समोर आली आहेत. त्यातच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याही नावाचा समावेश आहे. 


निया शर्मा (Nia Sharma), शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim),धीरज धुपर (Dheeraj Dhoopar), न्यारा बॅनर्जी (Nyrraa Banerji),शहजादा धामी (Shehzada Dhami),शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar),समीरा रेड्डी (Sameera Reddy) हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. 


 बिग बॉसचा ग्रँड प्रिमिअर 


बिग बॉसच्या 18 व्या सीझनचा ग्रँड प्रिमिअर कलर्स टीव्हीवर रात्री 9 वाजता सुरु होणार आहे. तसेच हा ग्रँड प्रिमिअर जिओ सिनेमावरही लाईव्ह पाहता येणार आहे. नुकतच बिग बॉसच्या घराचे फोटो समोर आले होते. त्यामुळे घराची हटके थीम पाहता यंदाच्या सीझनमध्ये काय हटके होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.