Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉस 18 सीझन सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य सध्या प्रेक्षकांचं जोरदार करताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमध्ये काही सदस्य पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. यासोबत बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या मानधनावरुनही चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस 18 साठी स्पर्धकांनी किती फी घेतली आणि यंदाच्या सीझनमधील सर्वात महागडा स्पर्धक कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. आता यंदाच्या सीझनमधील सर्वात जास्त फी घेणाऱ्या स्पर्धकाचं नावही समोर आलं आहे.


बिग बॉस 18 चा सर्वात महागडा स्पर्धक कोण?


बिग बॉस सीझन 18 मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेना सर्वात महागडा कलाकार आहे. विवियन डिसेनाने यंदाच्या सीझनमध्ये सर्वात जास्त मानधन घेतलं आहे. 'प्यार की ये एक कहानी', 'मधुबाला : एक इश्क एक जुनून' आणि 'शक्ती : अस्तित्व के एहसास की' या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेल्या विवियनचा मोठा चाहतावर्ग आहे.


बिग बॉस 18 मधील महागडा स्पर्धक


बिग बॉसची टीम मागील 8 वर्षांपासून विवियनशी संपर्क साधत त्याला शोची ऑफर देत होती, पण त्याने नेहमीच शोची ऑफर नाकारली. पण यावेळी त्याने हा शो स्वीकारला बिग बॉस शोसाठी दर आठवड्याला पाच लाख रुपये मानधन मिळत आहेत. पण ही फी बिग बॉसच्या आधीच्या स्पर्धकांच्या तुलनेत खूपच कमी आहे.






अंकिता लोखंडेच्या फीपेक्षा कितीतरी पट कमी


बिग बॉस 17 मधील अंकिता लोखंडेच्या फीच्या तुलनेत विवियन डिसेनाची फी 53 टक्के कमी आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेला दर आठवड्याला 12-13 लाख रुपये मानधन मिळत होते. हा आकडा विवियनच्या फीपेक्षा खूप जास्त आहे. अंकितासोबत, बिग बॉस 16 मधील सर्वाधिक कमाई करणारी दुसरी स्पर्धक सुंबूल तौकीर खान होती, तिला दर आठवड्याला 12 लाख रुपये फी मिळाली.


दुसरा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण?


90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही बिग बॉस 18 ची दुसरी सर्वाधिक कमाई करणारी स्पर्धक आहे. अभिनेत्री शिल्पाने रघुवीर, गोपी किशन आणि खुदा गवाह यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. शिल्पा  शिरोडकरला बिग बॉससाठी दर आठवड्याला अडीच लाख रुपये फी मिळत आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खतरों के खिलाडी 14 चा विजेता करणवीर मेहरा आहे. त्याला बिग बॉस 18 मध्ये दर आठवड्याला 2 लाख रुपये मानधन मिळत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan : आयकॉनिक ब्लू ब्रेसलेटमुळे सलमान खानचा जीव वाचला? फिरोजा ब्रेसलेट घालण्यामागचं कारण जाणून घ्या...