Tajinder Pal Singh Bagga On Sidhu Moose Wala: टेलिव्हिजनच्या इतिहासातील बहुचर्चित बिग बॉसच्या अठराव्या पर्वाला थाटात सुरुवात झाली. सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस शोच्या घरात अनेक दिग्गज सेलिब्रिटी बंद झाले आहेत. अशातच एकमेकांशी बोलताना हे सर्वजण अनेक धक्कादायक खुलासे करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस 18' (Bigg Boss)  या रिॲलिटी शोमध्ये भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या मृत्यूबाबत एक गोष्ट सांगितली आहे. ज्याबद्दल याआधी क्वचितच कोणाला माहिती असेल. बग्गा यांनी खुलासा करताना म्हटलं की, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूच्या 8-9 दिवस आधी एका ज्योतिषी मित्रानं त्यांना देश सोडण्याचा सल्ला दिला होता.


बिग बॉस 18 च्या अलीकडील भागामध्ये, भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात चर्चांना उधाण आलं आहे. सिद्धू यांच्या मृत्यूबाबत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.


सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू आणि ज्योतिषशास्त्रावरील विश्वास 


तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी सांगितलं की, त्यांचा आता ज्योतिषावर विश्वास आहे. मात्र, सुरुवातीला त्यांचा त्यावर विश्वास नव्हता. पण, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांना ज्योतिषशास्त्रावर पूर्णपणे स्विकारण्याची आणि कोणताही प्रश्न उपस्थित केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली. पुढे सांगताना त्यांनी सांगितलं की, सिद्धू मुसेवाला यांनी आपली कुंडली दाखवली होती. त्यावेळी एका ज्योतिषानं त्यांना देश सोडण्याचा सल्ला दिला होता. 


अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बोलताना तेजिंदर बग्गा म्हणाले की, "सुरुवातीला माझा ज्योतिषावर विश्वास नव्हता, पण माझा रुद्र नावाचा ज्योतिषी मित्र आहे. मी त्याचा सिद्धू मूसवालासोबतचा फोटो पाहिला, म्हणून मी त्याला विचारलं की, तू सिद्धू मुसेवालाला भेटलायस का? त्यानं मला सांगितलं की, सिद्धू त्याला त्याची कुंडली दाखवायला आला होता, ते ऐकूम मला आश्चर्य वाटलं, कारण मला माहिती नव्हतं कीस सिद्धू अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो."


ज्योतिषानं सिद्धू यांना देश सोडण्याचा सल्ला दिलेला 


बग्गा सदावर्तेंसोबत बोलताना पुढे म्हणाले की, "माझ्या मित्रानं सांगितलं की, सिद्धूनं त्याच्यासोबत चार तास घालवले. रुद्रनं सिद्धूला धोका असल्याचा इशारा देत देश सोडण्याचा सल्ला दिलेला. मी माझ्या मित्राला विचारलं की, त्यानं सिद्धूला सांगितलं की, त्याच्या जीवाला धोका आहे, पण तो म्हणाला की, "ज्योतिषशास्त्रात आपण थेट असं म्हणू शकत नाही की, एखाद्याच्या जीवाला धोका आहे, परंतु मी त्याला देश सोडण्याचा इशारा दिला होता."


"सिद्धू 8-9 तारखेला देश सोडणार होता"


तेजिंदर बग्गा पुढे बोलताना म्हणाले की, "त्यांनी सांगितलं की, सिद्धू 8 किंवा 9 तारखेच्या सुमारास देश सोडण्याचा विचार करत होता. माझ्या मनात प्रश्न होता की, शो आणि इतर माध्यमांतून दर महिन्याला 15-20 कोटी रुपये कमावणारा माणूस ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार देश सोडून कसा जाऊ शकतो? मी असं नसतं केलं. पण भाई 8 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मी ताबडतोब माझ्या मित्राला कॉल केला आणि त्याला मला काही सल्ला देण्यास सांगितलं. त्या क्षणापासून मी ज्योतिषावर आंधळेपणानं विश्वास ठेवू लागलो."


सिद्धू मुसेवाला यांना गोळ्या घालून ठार केलं 


29 मे 2022 रोजी सिद्धू मूसवाला यांची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या कारला घेराव घालण्यात आला आणि त्याच्यावर शुटर्सनी गोळ्यांचा वर्षाव केला. हे शूटर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीचे असल्याचं नंतर पोलीस तपासातून स्पष्ट झालं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Jahnavi Killekar: "...म्हणूनच मी 9 लाख घेतले, नसते घेतले तर..."; अखेर जान्हवी किल्लेकरनं सांगितलं 'ती' पैशांची बॅग उचलण्याचं कारण