Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. या पर्वातील स्पर्धक वाद आणि भांडणामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाने बाजी मारली आहे. सर्वाधिक पाहिले जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम 'टॉप 10'मध्ये आहे. अशातच आता या कार्यक्रमातील 'TOP 3' स्पर्धकांची नावे समोर आली आहे. वीकेंडच्या वाराला सलमानने (Salman Khan) 'टॉप 3' स्पर्धकांबद्दल भाष्य केलं आहे.
'बिग बॉस 17' या कार्यक्रमातील स्पर्धकांचे वाद चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. तर दुसरीकडे हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रेक्षकांच्या पसंतीस पडावा यासाठी निर्मातेदेखील विविध प्रयत्न करत आहेत. 'बिग बॉस'ची ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी स्पर्धक कोणत्याही थराला जात आहेत. खूप मेहनत घेत आहेत.
'बिग बॉस'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात दिल, दिमाग आणि दम या घरांना बंद करण्यात आलं आहे. तसेच स्पर्धकांनाही आपापल्या खोल्यांमधून सामान घेऊन बाहेर पडण्यास सांगितलं आहे. तसेच भाईजानने स्पर्धकांची शाळादेखील घेतली आहे. अभिषेक कुमारला त्यांच्या हिंसक सवईमुळे ओरडा मिळाला आहे.
सलमानने केला 'TOP 3' स्पर्धकांचा खुलासा
सलमान खानने 'बिग बॉस 17'मधील 'टॉप 3' स्पर्धकांचा खुलासा केला आहे. सलमानने एक प्रोमो शेअर केला आहे. यात तो 'बिग बॉस 17'मधील 'टॉप 3' स्पर्धकांबद्दल भाष्य करताना दिसत आहे. सलमानने एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) आणि ईशा मालवीय (Isha Malviya) या स्पर्धकांची नावे घेतली आहेत.
'या' स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी लढत
'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीसाठी घरातील सर्व स्पर्धक खूप मेहनत घेत आहेत. नुकताच कोरियन गायक आओराची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तर सना सईस खानने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. आता मन्नारा, ऐश्वर्या, अभिषेक, ईशा, विकी, नील, अनुराग, रिंकू, अरुण, खानजादी यांच्यात ट्रॉफीसाठी लढत पाहायला मिळत आहे.
'बिग बॉस 17' कुठे पाहू शकता? (How to Watch Salman Khan Bigg Boss 17)
'बिग बॉस 17' हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि वीकेंडला अर्थात शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता कसर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळेल. 'बिग बॉस 17'मधील 'वीकेंड का वार' नेहमीप्रमाणे यंदाही खास असेल.
संबंधित बातम्या