Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉस 17 मधून तहलका भाई उर्फ सनी आर्य शोमधून बाहेर पडला होता. शोमध्ये सनी आर्याचे (Sunny Arya) अभिषेकसोबत भांडण झाले होते.सोनी आणि अभिषेक यांच्यामध्ये बाचाबाची होत असताना सनी आर्याचा संयम सुटला आणि त्याने अभिषेकचा शर्ट पकडला. त्यानंतर बिग बॉसने कारवाई करत सनी आर्याला बाहेर काढले. आता बिग बॉस-17 शोमध्ये एका नॉमिनेशन टास्कचं आयोजन करण्यात आलं होतं. या टास्क दरम्यान काही स्पर्धकांमध्ये बाचाबाची झाली.
स्पर्धकांनी एकमेकांवर फेकली कॉफी
बिग बॉस 17 या शोमध्ये या आठवड्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकताच बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की बिग बॉस स्पर्धकांना सांगतात की, "आज तुम्हाला ज्याला नॉमिनेट करायचे आहे, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर कॉफी फेका" त्यानंतर स्पर्धक एकमेकांवर कॉफी फेकून नॉमिनेट करतात.
मुनव्वर फारुकीनं ऐश्वर्याच्या अंगावर कॉफी फेकून तिला नॉमिनेट केलं. अंकिताने मन्नारावर कॉफी फेकली आणि मन्नाराने अंकितावर कॉफी फेकली. अंकिता म्हणते की, "तू मला आवडत नाहीस." अभिषेकने सनावर कॉफी फेकली तर ऐश्वर्याने अभिषेकला नॉमिनेट केले. अभिषेक आणि अरुण यांच्यात शाब्दिक युद्धही झाले. तसेच अंकिता आणि मन्नारा यांच्या देखील भांडण झालं आहे. आता आजच्या एपिसोडमध्ये या आठवड्यात कोणाला नामांकन मिळाले आहे हे निश्चित केले जाईल.
पाहा प्रोमो:
विकी जैन, अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी अशा अनेक स्पर्धकांनी बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. सलमान खान या कार्यक्रम होस्ट करतो. वीकेंड का वारमध्ये सलमान खान हा स्पर्धकांची शाळा घेत असतो. आता बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: