Dinesh Phadnis:

  छोट्या पडद्यावरील सीआयडी (CID) या प्रसिद्ध शोमध्ये फ्रेड्रिक्सची भूमिका साकारुन  विशेष लोकप्रियता मिळवलेले अभिनेते  दिनेश फडनिस (Dinesh Phadnis) यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती.  पण आता  सीआयडीमधील दया ही भूमिका साकारणारे अभिनेते दयानंद शेट्टी यांनी दिनेश यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. दयानंद यांनी दिनेश यांना हार्ट अटॅक आल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.


दिनेश फडनिस यांना हार्ट अटॅक आल्याची अफवा (Dinesh Phandis Health Update)


इंडियन एक्स्प्रेसला दिनेश यांची हेल्थ अपडेट देताना दयानंद शेट्टी  म्हणाले, 'दिनेश फडनिस यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर त्यांचे निरीक्षण करत आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, त्याच्यावर वेगळ्या कारणांमुळे उपचार सुरू आहेत. यावर मी आत्ताच भाष्य करू इच्छित नाही."


रिपोर्टनुसार,  दिनेश फडनिस यांच्यावर तुंगा या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनेश यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे.  त्यांना भेटण्यासाठी सीआयडी (CID) शोमधील कलाकार देखील रुग्णालयात गेले होते.






दिनेश यांनी  सीआयडी या लोकप्रिय शोमध्ये त्याने इन्स्पेक्टर फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली होती. या शोमधील त्यांच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्याने या शोमध्ये अनेक वर्षे काम केले. दिनेश यांची कॉमेडी चाहत्यांना आवडली होती. या शोमध्ये दयानंद शेट्टीने इन्स्पेक्टर दया ही भूमिका साकारली होती. 


दिनेश यांनी 'या' चित्रपटांमध्ये केलं काम


CID या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दिनेश तारक मेहता का उल्टा चष्मामध्येही दिसला होता. या शोमध्ये एक छोटी भूमिका त्यांनी साकारली होती. त्याने आमिर खानच्या चित्रपटातही काम केले आहे. सरफरोश या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. दिनेश यांनी ‘भरला हा मालवत रक्त’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे. हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या सिनेमांतही ते झळकले.  त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला यावे अशी चाहत्यांची इच्छा आहे.


संबंधित बातम्या


CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस  रुग्णालयात दाखल