Sunny Arya: लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस 17 (Bigg Boss 17) सुरू झाला आहे. काल या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला. या कार्यक्रमात अनेक टीव्ही सेलिब्रिटी तसेच यूट्यूबर्स सहभागी झाले आहेत. बिग बॉस 17 या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर सनी आर्यानं (Sunny Arya) देखील सहभाग घेतला आहे. सनीचे एक युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरील त्याच्या अतरंगी व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सनीबद्दल...
सनीच्या व्हिडीओला मिळते नेटकऱ्यांची पसंती
सनी आर्या हा दिल्लीच्या उत्तम नगरचा रहिवासी आहे. तो प्रसिद्ध यु्ट्यूबरव आहे. त्याचे यूट्यूबवर तहलका प्रँक (Tehelka Prank ) नावाचे एक चॅनेल आहे. या चॅनलवर तो विविध प्रँकचे व्हिडीओ शेअर करतो. या व्हिडीओच्या माध्यमातून तो लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. सनीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात.
कोरोनाकाळात सुरू केले यूट्यूब चॅनल
कोरोनाकाळात 2019 मध्ये कोरोनाकाळात त्याने सनीनं यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याच्या अनोख्या कल्पना, कॉमेडी आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तो खूप लवकर प्रसिद्ध झाला.सध्या त्याच्या 'तहलका प्रँक' या YouTube चॅनलवर 4 लाखांहून अधिक सबक्राइबर्स आहेत. याशिवाय त्यांनी इतर युट्यूब चॅनेल्स देखील क्रिएट केले आहेत. ज्यामध्ये तेहलका व्लॉग्स एक चॅनल आहे जिथे तो विविध व्लॉग शेअर करतो. तसेच त्याचे हेल्पिंग सनी आर्या नावाचे चॅनल देखील आहे.
सनी आर्या हा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. इंस्टाग्रामवर त्यांचे 706K फॉलोअर्स आहेत. त्याची पत्नी दीपिका आर्या देखील सनीला कामात मदत करत असते. सनीने आपल्या पत्नीचे देखील अनेकदा प्रँक केले आहे. सनी हा सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. सोशल मीडियानंतर आता सनी बिग बॉस 17 च्या घरात धुमाकूळ घालताना दिसणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: