Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) फेम अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) 'बिग बॉस 17'मध्ये (Bigg Boss 17) एन्ट्री घेतली आहे. या पर्वात अभिनेत्री इतर स्पर्धकांसह पती विकी जैनसोबत (Vicky Jain) खेळ खेळताना दिसणार आहे. विकीसोबत रोमँटिक डान्स करत तिने बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री घेतली आहे. अंकिता या पर्वातील सर्वात महागडी स्पर्धक असून 200 कपडे घेऊन तिच्या बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.


200 कपडे अन् बरंच काही...


अंकिता एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत उत्कृष्ट नृत्यांगनादेखील आहे. 200 कपड्यांसह अभिनेत्रीने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरला भाईजान सलमान खाननेही याचा उल्लेख केला. भाईजानसोबत बोलताना अंकिता म्हणाली,"बिग बॉस'मधील प्रत्येक प्रसंग आणि खेळ लक्षात घेऊन मी कपडे आणले आहेत". 


अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17'मधली सर्वात महागडी स्पर्धक!


अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17'मधली सर्वात महागडी स्पर्धक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेने 12 लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे. 






सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे


अंकिता लोखंडेला 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. या मालिकेत ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण काही कारणांनी त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला.


अंकिता लोखंडेबद्दल जाणून घ्या... (Who is Ankita Lokhande)


अंकिता लोखंडे यांनी 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'बागी 3','मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमांत अंकिताच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. अंकिता लोखंडेने साकारलेली अर्चना आज घराघरांत लोकप्रिय आहे. आजही तिची क्रेझ कायम आहे. आजही तिची क्रेझ कायम आहे. अंकिता लोखंडे या पर्वाची विजेती व्हावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...