Bigg Boss 16: टीव्हीवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा सीझन 16मध्ये (Bigg Boss 16) रोजच नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच यावेळीही काही स्पर्धक त्यांच्या मैत्रीमुळे, तर काही स्पर्धक त्यांच्यातील वैरामुळे खूप चर्चेत आले आहेत. या सगळ्यात शालीन भानोत आणि सुंबुल तौकीर यांची वाढती जवळीक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. शालीन आणि सुंबुल एकमेकांचे ‘फक्त चांगले मित्र’ असल्याचे म्हणवतात. पण, घरातील त्यांच्या वागण्यावरून सगळ्यांनीच वेगेळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. मात्र, यावरूनच आता शालीनला चांगले बोल ऐकावे लागणार आहेत. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान शालीनला फटकारणार आहे.
या आठवड्यात सलमान खान शालीनची चांगलीच कानउघडणी करणार आहे. तर, अर्चना गौतम आणि अब्दू रोजिक यांचं तो कौतुक करणार आहे. त्याचबरोबर या आठवड्यात होणाऱ्या एलिमिनेशनचीही माहितीही यावेळी मिळणार आहे.
तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरचा अपमान
मेडिकल चेकअपसाठी आलेल्या डॉक्टरला शालीन भानोतने चुकीची वागणूक दिली होती. ‘वीकेंड का वार’मध्येही हा मुद्दा उपस्थित होईल, असे म्हटले जातच होते आणि आता तसेच होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांसोबतच्या त्याच्या वागणुकीबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल सलमान खान शालीनवर आगपाखड करणार आहे.
नुकताच नव्या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सुंबुलचे वडील शालीनला खडे बोल सुनावताना दिसत आहेत. सोबतच ते आपल्या मुलीलाही आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुंबुलचे वडील 'बिग बॉस'मध्ये येतात आणि आपल्या मुलीला सलमान खानसमोर म्हणतात, 'तुला इतकं निर्मळ मनाचं पाहून मला भीती वाटते. बेटा, जग कसं आहे ते एकदा डोळे उघडून बघ.' वडिलांचे हे बोल ऐकून सुंबुलचे डोळेही पाणावतात.
वडिलांनी लेकीलाही सुनावले!
यानंतर अभिनेत्रीचे वडील शालीनवर बरसतात आणि म्हणतात की, 'शालीन जेव्हा तुला भेटली, तेव्हा ती निर्मळ मनाची होती. पण मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तु हे काय केलस? तू तिचा तमाशा केला आहेस.' सुंबुलचे वडील इतकंच बोलून थांबत नाहीत. ते पुढे त्यांच्या मुलीला म्हणतात की, 'सुंबुल तू पाहत नाहीस की, तुझा कसा वापर केला जातो आहे'. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून सुंबुल रडू लागते. शोचा हा प्रोमो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा प्रोमो पाहता आजचा 'वीकेंड का वार' धमाकेदार असणार हे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा :