Bigg Boss 16: 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता हा शो अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस- 16 चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरले? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. बिग बॉसमधील एका एपिसोडमध्ये शालीन भानोत हा स्टॅन आणि शिव यांच्यासमोर भावूक झालेला दिसला.
शालीन आणि प्रियांका यांची मैत्री होती. दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग होते. पण आता प्रियांका टीनाची मैत्रीण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून टीना आणि शालीन हे दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत, त्यामुळे आता प्रियांकाही शालीनसोबत बोलत नाही. प्रियांका ही शालीनसोबत अनेकवेळा भांडण करते. अर्चना टीना आणि प्रियंकासोबत इंग्रजी भाषेत बोलत मजा करत आहे. दरम्यान, अर्चना शिवला इंग्रजीबद्दल चिडवते.
शालीन गार्डनमध्ये बसून स्टॅन आणि शिव यांच्याशी अर्चनाविषयी बोलत असताना, हे ऐकून प्रियांका चिडते. त्यानंतर शालीन आणि प्रियांका यांच्यात वाद सुरू झाला. प्रियांका शालीनला सांगते की, तू आता अर्चनाबद्दल काही बोललीस तर मला ते सहन होणार नाही. शालीनचे म्हणणे आहे की प्रियांकाकडे बोलायला कोणतेही मुद्दे नाहीत, ती इतरांच्या समस्यांमध्ये गुंतत राहते. तसेच शालीन जेव्हा व्यायाम करत असतो, तेव्हा टीना आणि प्रियांका त्याला चिडवत असतात.
स्टॅन आणि शिव यांच्या समोर रडला शालीन
शिवा आणि स्टॅनसमोर शालीन रडू लागतात. शालीन शिवला सांगतो की, तू मला नॉमिनेट करशील, असं वचन दे. शिवा आणि स्टॅनला शालीन म्हणतो, कृपया मला नॉमिनेट करा कारण मी हे चार दिवस सहन करणार नाही. तर शिव आणि स्टॅन यांचे म्हणतात की, कोणाचे प्रयत्न किती आहेत हे आम्हाला माहीत आहे. स्टॅन म्हणतो की, तू एकटा आहेस म्हणून आम्ही आलो. शिव आणि स्टॅन शालीनला समजावून सांगतात.
बिग बॉस या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. विकेंडला सलमान खान शोमध्ये येऊन बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांसोबत संवाद साधतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: