Shiv Thakare Success Story : 'बिग बॉस मराठी'मुळे (Bigg Boss Marathi) घराघरांत पोहोचलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) गाजवत आहे. आज शिवच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी याप्रवासापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.
शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' (MTV Roadies) या कार्यक्रमात दिसला होता. पण रोडीज खेळणाऱ्या शिवला मात्र अंधाराची प्रचंड भीती वाटते. 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व जिंकल्यानंतर शिवला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शिव म्हणाला,"मला सगळ्यात जास्त अंधाराची भीती वाटते".
शिवने केलंय वृत्तपत्र विकण्याचे काम
कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं हे ध्यानात ठेऊन शिव ठाकरेने आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मनोरंजन विश्वात येण्याआधी शिवने वृत्तपत्र विकण्याचे काम केले आहे. तसेच तो घरोघरी जाऊन दुधाच्या पिशव्यांची विक्री करत होता. पुढे डान्सची आवड असल्याने त्याने डान्स क्लास घ्यायला सुरुवात केली. यासर्व कामांतून मिळणारे पैसे शिव त्याच्या आईला देत असे.
'बिग बॉस'मध्ये जाण्याची शिवची इच्छा पूर्ण!
शिव ठाकरेला 'बिग बॉस' हा कार्यक्रम प्रचंड आवडतो. गेल्या सहा वर्षांपासून तो या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची प्रतीक्षा करत होता. 'बिग बॉस मराठी' आधी भाईजानच्या 'बिग बॉस'मध्ये जाण्याची त्याची इच्छा होती. अखेर 'बिग बॉस 16' साठी त्याला विचारणा झाली आणि त्याची इच्छा पूर्ण झाली. शिवने त्याच्या घरातील भिंतीवर 'बिग बॉस 16'चा विजेता शिव ठाकरे, असं लिहिलं आहे.
शिव ठाकरे होणार विजेता? (Shiv Thakare Win Bigg Boss 16)
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेच्या बहिणीने माझा भाऊच 'बिग बॉस 16' जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मराठमोळा शिव ठाकरे जिंकावा यासाठी चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत. शिव ठाकरे एक उत्तम खेळाडू आहे. त्याला बिग बॉसचा खेळ कळला आहे. तो जिद्दी असण्यासोबत प्रामाणिकपणे हा खेळ खेळतो आहे. त्यामुळे 'बिग बॉस 16'चा विजेता शिव ठाकरे होऊ शकतो.
संबंधित बातम्या