Bigg Boss 16 : ‘दबंग’ सलमान खानचा (Salman Khan) शो ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) प्रीमिअर नुकताच पार पडला असून, आता या घरातील खेळ सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे कालकार स्पर्धकांनी याची धमाकेदार सुरुवात केली. ‘छोटी सरदारनी’ फेम अभिनेत्री निमरित कौर (Nimrit Kaur Ahluwalia) या शोची पहिली स्पर्धक ठरली होती. ‘छोटी सरदारनी’ या शोने सर्वांची मने जिंकणाऱ्या निमरितने शोमध्ये येताच खळबळ उडवून दिली. मंचावर येताना ती डोळ्यावर पट्टी बांधून आली आणि सलमान खानसमोर उभी राहिली. डोळ्यांवरची पट्टी काढत ती सलमानला म्हणाली की, बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी मला तुझा चेहरा पाहायचा आहे.


निमरित म्हणाली की, सलमान खान तिच्यासाठी खूप लकी आहे. त्यानंतर निमरितने सलमानला सांगितले की, ती पेशाने एक वकील देखील आहे. यानंतर निमरितने तिचा काळा कोट चढवला आणि अभिनेता सलमान खानवर काही आरोप केले.


पहिला आरोप...


निमरितने सर्वप्रथम सलमान खानवर आरोप केला केला की, तुम्ही भारतातील अनेक मुलींचे हृदय तोडले आहे. यावर सलमान म्हणाला की, हे खोटं आहे कारण भारतातील प्रत्येक मुलगी आता आनंदी आहे. दुसरा आरोप करताना निमरित कौर अहलुवालिया म्हणाली की, तुम्ही चित्रपटांमध्ये शर्टलेस होता, पण खऱ्या आयुष्यात नाही. तेव्हा सलमान म्हणतो की, ही गोष्ट चुकीची आहे मी सिद्ध करून शकतो आणि लगेच शर्ट काढू शकतो. हे बोलून सलमान शर्टची बटणं उघडायला लागतो.



यानंतर निमरितने तिसरा आरोप केला की, सलमान कमी लोकांसोबत डान्स करतो. निमरितचा हाही आरोप खोडून काढण्यासाठी सलमानने निमरितसोबत 'ऐथे आ' गाण्यावर डान्स देखील केला.


‘बिग बॉस 16’च्या घरात प्रवेश करणारी पहिली स्पर्धक


मंचावरील धमाल संपवून निमरित बिग बॉसच्या घरात जाते. ‘बिग बॉस 16’च्या घरात प्रवेश करणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे. त्यानंतर बिग बॉस तिच्याशी संवाद साधतात आणि तिला कॅप्टन बनण्याची संधी देत म्हणतात की, जर तुम्हाला कॅप्टनसाठी स्पर्धक बनायचे असेल तर, तुम्हाला घरातील स्पर्धकांना काही ड्युटी द्याव्या लागतील. यानंतर निमरितने बिग बॉसच्या संपूर्ण घराची सफर केली आणि प्रेक्षकांनी देखील या घराची भव्यता दाखवली. कॅप्टन बनण्यासाठी आता निमरितही तिच्या पाठोपाठ येणाऱ्या स्पर्धकांना ड्युटी देत ​​आहे.


संबंधित बातम्या


Salman Khan: 'बिग बॉससाठी घेतलं कोट्यवधींचे मानधन?' सलमान म्हणाला, 'एवढे पैसे मिळाले तर आयुष्यभर...'


Bigg Boss 16 : युट्यूबर अब्दु राजिक होणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये सहभागी; व्हिडीओ व्हायरल