Bigg Boss 16 : सलमान खानच्या (Salman Khan) तुफानी एन्ट्रीने 'बिग बॉस 16'ची (Bigg Boss 16) सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक 'बिग बॉस 16' ची प्रतीक्षा करत होते. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. 'बिग बॉस 16'चा दिमाखदार ग्रॅंड प्रीमियर नुकताच पार पडला. 'गेम बदलेगा क्यूंकी बिग बॉस खुद खेलेगा' अशी यंदाच्या पर्वाची थीम आहे. 


'बिग बॉस 16'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. भाईजानने एकापाठोपाठ एक स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली आहे. निमरित कौर अलवालीया (Nimrit Kaur Ahluwalia) बिग बॉसच्या घरात सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. 


'बिग बॉस 16'मध्ये कोणत्या स्पर्धकांचा सहभाग? 


छोटी सरदारनी फेम निमरित कौर अलुवालिया, गायक अब्दू राजिक, अंकित गुप्ता, प्रियंका चाहर चौधरी, रॅपर 'एम सी स्टॅंन' , अचर्ना गौतम, अभिनेता गौतम विग, शालिन भनोट, 'इमली' फेम सुंबुल तौकीर, भोजपुरी अभिनेत्री सौंदर्या शर्मा, 'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे, सुंबुल तौकीर, 'मिस इंडिया रनर अप' मान्या सिंह, राजस्थानची प्रसिद्ध डान्सर गोरी नागोरी, टीना दत्ता, श्रीजिता डे, बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान हे स्पर्धक 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाले आहेत. 






बिग बॉसच्या घराला येणार घरपण!


बिग बॉस पहिल्यांदाच खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.या पर्वात हाऊसमास्टर गेम खेळणार असून सर्व स्पर्धकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणून 'बिग बॉस'कडे पाहिले जाते. 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक कधी भांडणाने, कधी रडण्याने, कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉसच्या घराला घरपण आणायला सज्ज झाले आहेत. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 16 Live Streaming : सलमानच्या ‘बिग बॉस 16’चा ग्रँड प्रीमिअर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?


Bigg Boss Marathi 4 : उद्यापासून रंगणार 100 दिवसांचा खेळ; 'बिग बॉस मराठी 4'चा होणार ग्रॅंड प्रीमियर