Bigg Boss 15 : 'बिग बॉस मराठी'चा माजी स्पर्धक आणि राजकारणी नेता अभिजीत बिचुकलेची अखेर आता बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या घरातील प्रवेशाला विलंब झाला होता. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकलेची 'बिग बॉस 15' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्याची दाखवली आहे.
अभिजीत बिचुकले आता बिग बॉसच्या घरात काय समीकरण बनवणार हे पाहणे मनोरंजक असेल. देवोलीना भट्टाचार्जी सध्या शमिता शेट्टीवर निशाणा साधताना दिसत आहे. दरम्यान राखी सावंत, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राला टोमणे मारताना दिसत आहे. अभिजीत घरात प्रवेश करण्याआधीच म्हणाला आहे,"मी शो अधिक मनोरंजक बनवेल. जर मला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला तर मी या पर्वाचा नक्कीच विजेता असेल". बिचुकलेचा खेळ आणि डावपेच पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
"आय अॅम अ आर्टिस्ट, आय अॅम अ रायटर, आय अॅम अ पोएट, आय अॅम अ सिंगर, आय अॅम अ कम्पोझिशन मेकर, आय वाँट टू बी अ बिकम...",असं म्हणत अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. 'बिग बॉस 15' कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. पण अभिजीत बिचुकलेच्या एन्ट्रीमुळे या चर्चांना जोर आला आहे. अभिजीत बिचुकलेने कवी मनाचे नेते अशी ओळख मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात केली होती. आता हिंदी बिग बॉसमध्ये बिचुकले काय ओळख बनवणार हे पाहणे रंजक असणार आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेचा 'जलवा' आता हिंदी 'बिग बॉस'मध्ये, वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर सलमानही चक्रावला
Bigg Boss Marathi 3 : अच्छा तो हम चलते है! गोल्डमॅन दादूसने घेतला 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha