मुंबई : रियालिटी शो 'बिग बॉस'च्या 11व्या सीजनची विजेती शिल्पा शिंदेने आपल्या लग्नाबाबत अखेर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत शिल्पाने पहिल्यांदाच लग्नाबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.


'स्पॉट बॉय' वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदेने लग्नाबाबत उत्तर दिलं. सध्या तरी लग्न करण्याच कोणताच विचार नसल्याचं यावेळी शिल्पा म्हणाली. पण भविष्यात मी लग्न करु शकते असंही ती म्हणाली.

'सध्या मी सिंगलच बरी आहे. सिंगल असल्याने मला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचा मला चांगला उपभोग घेता येत आहे. पण भविष्यात त्याबाबत विचार करेन. लग्न हा खूप मोठा निर्णय असतो. त्यामुळे तुमचा जो पार्टनर असतो त्याचे विचार तुमच्याशी जुळणं गरजेचं आहे.' असं ती यावेळी म्हणाली.

बिग बॉसच्या 11व्या सीजनमध्ये शिल्पा शिंदेच्या लग्नाबाबत बरीच चर्चा झाली होती. एवढचं नाही तर तिची प्रतिस्पर्धी हिना खानने शिल्पाच्या लग्नाविषयी अनेकदा बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, असंही म्हटलं जातं की, शिल्पा शिंदे आणि रोमित राजचं लग्नही ठरलं होतं. पण ऐनवेळी हे लग्न मोडलं होतं. त्यामुळे शिल्पा शिंदे अद्यापही सिंगलच आहे.