मुंबई : बिग बॉसच्या घरात कधी काय होईल, याचा नेम नाही. यंदाच्या पर्वामधील सर्वात वादग्रस्त जोडी म्हणजेच 'भाभीजी घरपे है' फेम अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि निर्माता विकास गुप्ता या शोमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. मात्र हे लग्न खरंखुरं नसून फक्त शोपुरतं आहे.

सारा खान- अली मर्चंट, मोनालिसा-विक्रांत यासारखी अनेक अफेयर्स आणि लग्न बिग बॉसच्या घरात जुळली आहेत. जशी या शोमध्ये काही लग्नं जमली, तसे काही संसार मोडलेही आहेत.

बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?


बिग बॉसच्या 11 व्या पर्वात शिल्पा आणि विकासमधली भांडणं प्रेक्षकांनी चवीने पाहिली आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्सनी कार्यक्रमात त्यांचं खोटं-खोटं लग्न करण्याचा घाट घातला आहे.

बिग बॉस स्पर्धकांना एक टास्क देणार असून त्यामध्ये शिल्पा आणि विकासचं लग्न लावण्यात येणार आहे. उर्वरित स्पर्धकांची दोन गटात विभागणी करण्यात येणार असून ते वऱ्हाड्यांची भूमिका बजावतील.

विशेष म्हणजे, #Shikas अर्थात शिल्पा आणि विकासच्या एकत्रित नावाचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्डमध्ये पाहायला मिळत आहे. काही चाहत्यांनी दोघांचं खरंच लग्न व्हावं, अशी इच्छाही व्यक्त केली आहे.